जत | रस्स्यात पडल्याने बालिकेचा भाजून मुत्यू

0
4

जत,प्रतिनिधी:तालुक्यातील संख येथे मटनाच्या उकळत्या रस्स्याच्या पातेलात पडल्याने साक्षी योगेश कांबळे या चार वर्षाच्या बालिकेचा भाजून मृत्यु झाला.  गंभीर भाजल्याने तिला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते.
संख येथील योगेश कांबळे यांच्या घरी गुरूवारी मोहरमनिमित्त मांसाहारी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सायंकाळी रस्सा तयार झाल्यानंतर अचानक पाऊस आला. त्यामुळे उकळत्या रस्स्याचे पातेले घारामध्ये ठेवले. यावेळी घरात खेळत असलेली साक्षी ही बालिका रस्स्याच्या पातेल्यात पडली. घरात अनेक लोक असल्याने तिला तातडीने बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र डॉक्टर व रूग्णवाहिका दोन्हीही उपलब्ध न झाल्याने तिला खासगी वाहनाने मिरजच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी तिचे निधन झाले. साक्षीचे वडील गवंडी काम करतात. या कुटुंबातील बालिकेचा दुर्देैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here