आंवढी, वार्ताहर: आंवढी ता.जत येथील दारू बंदीचे ग्रामपंचायतीत दोन वेळा ठराव,पोलीस, उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करूनही अद्याप दारू बंदी न झाल्याने दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी महिला समितीच्या वतीने सुमारे 25 महिलांनी जत तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.उत्पादन शुल्कचे मिरज विभागीय अधिकारी आंनदराव पवार यांनी उपोषण कर्त्या महिलाची भेट घेऊन प्रशासनाची बाजू सांगून दारूबंदीसाठी कायदेशीर मार्ग अवलंबून महिलाचे मतदान घेऊन पुर्ण दारू बंदी करू असे लेखी आश्वासन दिल्याने सायकांळी उपोषण मागे घेण्यात आले.
आंवढीतील बेकायदेशीर दारू, गांजा,मटका,सिंदी अड्डे बंद करावेत म्हणून महिलाची समिती करून आंवढीतील महिला लढा देत आहेत.गावातील प्रमुख चौकात बेधडक सुरू असलेल्या या अवैद्य धंद्यामुळे गावची शांतता भंग होत आहे. त्याशिवाय गावातील युवा पिठी बरबाद होत आहे. दारू,सिंदी,मटक्यासारख्या व्यवसायाने अनेक घरे उध्दवस्त झाली आहेत.त्यामुळे आंवढीतील अवैद्य धंदे बंद करावेत यासाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. गावाचे युवा संरपच आण्णासाहेब कोडग यांचीही त्यांना मोठी साथ लाभली आहे.अवैद्य धंदे बंद करावेत यासाठी ग्रामपंचायतीच्या वार्षिक सभेत घेण्यात आला. जत पोलिस,उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ठिय्या अंदोलन करूनही हे अवैद्य धंदे बंद होत नसल्याने आता महिला आक्रमक झाल्या आहेत. संतप्त महिलांनी बुधवारी थेट तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. सायकांळी चारच्या दरम्यान उत्पादन शुल्क विभागीय निरिक्षक आंनदराव पवार यांनी उपोषण स्थंळी येत प्रशासन दारू बंदीसाठी सकारत्मक आहे. पंरतू कायदेशीर मार्गाने जाणे गरजेचे आहे. रितसर दारूबंदीसाठी महिलाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करून त्यासाठी महिलाचे मतदान घ्यावे लागणार आहे. त्यासाठी आम्ही तयारी करू आंवढीतील महिला,लोकप्रतिनिधीनी एकत्रित प्रयत्न करावेत अशा सुचना मांडल्या व शासनाच्या नियमाच्या प्रती अंदोलन कर्त्या महिलांना दिल्या.
अंदोलनात संगिता कोडग, रतन कोडग,प्रतिभा कोडक,काचन कोडग,अर्चना कोडग, सविता कोडक,अलका कोडग,मनाबाई कोडग,मालन कोडग,मनिषा कुंभार,नंदाबाई देशमुख, शालन कोडग,रत्नप्रभा कोडग,अनुसया तोरणे,सुनिता वाघमारे,सखुबाई कोडग आदी महिलांनी सहभागी झाल्या.
आंवढीतील दारूबंदीसाठी महिलांनी बुधवारी उपोषण केले.





