माडग्याळ | एक गुणा खाना, दोन गुणा पिणा, तीन गुणा व्यायाम करना व चार गुणा हसणा हा मूलमंत्र : डॉ.आरळी

0
4

माडग्याळ,वार्ताहर:योग्य आहार घेऊन रोज व्यायाम करा तरचं शरीर सदृढ राहून आजारापासून सुटका मिळेल.एक गुणा खाना, दोन गुणा पिणा, तीन गुणा व्यायाम करना व चार गुणा हसणा हा मूलमंत्र असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.रविंद्र आरळी यांनी केले ते, तिरंगा गणेश मंडळ माडग्याळ यांच्या वतीने आयोजित आरोग्य विषयक कार्यक्रम मध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी डॉ.शेखर हिट्टी,डॉ.चंद्रमणी उमराणी, डॉ.सार्थक हिट्टी प्रमुख उपस्थित उपस्थित होते. डॉ.आरळी पुढे म्हणाले, प्रत्येक माणसाच्या प्रतिकारशक्ती वरती कोणताही आजार बरे होण्याचे सुञ अवलंबून असते. ती प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी चांगले जेवण, आहारामध्ये पालेभाज्या, तळलेले पदार्थ कमी खाणे, पाणी भरपुर पिणे, योगासन करणे ही पत्ये पाळणे गरजेचे आहे.वजन कमी करण्यासाठी उपवास करू नका त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.तेलकट व तळलेले पदार्थ खाऊ नका व तळलेले राहिलेले तेल परत वापरू नका.असे तेल वापरल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होतील. त्यात मधुमेह,कँसर,असे गंभीर आजार ओढवू शकतात.
डॉ.आरळी म्हणाले,रोज 45 मिनिटे व्यायाम केला पाहिजे त्यात योगासने,पोहणे, सायकलिंग,चालणे,पाणी पिणे हे मुख्यत्वे काम केले पाहिजे. जेणेकरून शरीरातील मेंदू, हृदय,किडनी, लिवर,फफ्फुस हे पाच महत्वाचे अवयव चांगले राहतील.पाच अवयव व्यवस्थित राहिले तर आजारी कोणीही पडणार नाही असे त्यांनी सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here