जत,प्रतिनिधी: उमराणी (ता.जत)येथे शुक्रवारी सायकांळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घरातील गँस सिलेंडरचे रेग्युलेटर बदलत असताना सिलेंडरच्या पाईपने पेट घेतल्याने घरात आग लागली.उपस्थिती काही जणांनी सिंलेडरला तार लावून आग विजविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आगीत
घरातील साहित्य, कपड असे दहा हाजाराचे साहित्य भस्मसात झाले. अधिक माहिती अशी की, उमराणी महादेवी आप्पासो माळी यांचे घरी दत्ता रामचद्र पुजारी हे भाङ्याने राहतात.शुक्रवारी सायकांळी पुजारी हे घरातील गँसचे रेग्यूलेटर बदलत होते.अचानक गॅसची पाईप लिकेज झाली व गँसमुळे पेट घेतल्या.अचानक उद्धभविलेल्या या परिस्थिती सर्वांची पळापळ झाली.काही सुज्ञ नागरिकांनी तारेच्या साह्याने गँस सिंलेडर घराबाहेर काढून वाळू टाकली व दवाखान्यातील फायर सिंलेडरद्वारे आग विजविल्याने पुजारी कुंटुबीयांनी सुटकेचा श्वास घेतला.आगीत घरातील कपङे व इतर साहित्य पेटले.सुमारे दहा हाजाराचे नुकसान झाले आहे.





