जत,प्रतिनिधी:जत -विजापूर रोडवरील संग्राम पेट्रोल पंपावर कामगाराने डिजेल विक्रीचे 1 लाख 34 हाजार 71 रुपये घेऊन पोबारा केला.अविनाश अनिल कोळी(वय-22) असे कामगाराचे नाव आहे.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी,विजापूर रोडवर संग्राम पेट्रोल पंप आहे.तेथे निगडी खुर्द येथील अविनाश हा 20 दिवसापुर्वी कामास आला होता.कामगारांच्या दररोज दोन सीप्ट मध्ये काम करतात.अविनाश मंगळवार सायकांळ पासून कामावर होता.बुधवारी सकाळपर्यत त्याच्या मशिनमधील विकलेल्या डिजेलचे 1 लाख 34 हाजार 71 रुपये त्यांच्याकडे होते.सकाळी चहा पिऊन येतो म्हणून अविनाश बाहेर पडला आहे. तो अद्यापपर्यत पंपावर आला नाही.त्यांचा मोबाईल ही बंद असल्याने त्यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद जगताप यांनी जत पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. अधिक तपास सा.पोलिस निरिक्षक सचिन गढवे करत आहेत.





