बांधकाम विभाग,ग्रामपंचायत हतबल
माडग्याळ,वार्ताहर: माडग्याळ ता.जत येथे रस्त्यावरील आठवडा बाजार प्रशस्त जागेत बसवावा यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्चून बांधलेले सर्व सुविधायुक्त बाजार कठडे बांधकामापासून बिनकामाचे बनले आहेत. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे जत-चडचडण रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यामुळे रस्ता मुत्यूचा सापळा बनला आहे.ग्रामपंचायत प्रशासन याबाबतीत हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून बाजार सुसज्ज जागेत स्थंलातर करावा अशी मागणी होत आहे.
जत पुर्व भागातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या माडग्याळ गावातील रस्त्यावरील बाजारामुळे गावाची दुर्दशा होत आहे.शुक्रवार आठवडा बाजार दिवशीतर थेट रस्त्यावर भाजीपाला व किरकोळ विक्रर्ते रस्त्यावरच बसत असल्याने चालत जातानाही जीव मुठीत घेऊन नागरिकांना चालावे लागते.वाहन चालकांनंतर बाजार समिती ते गावाबाहेर जाईपर्यत तब्बल अर्धा-अर्धा तास वाहतून कोंडीतून बाहेर पडायला लागत आहे.
दुसरीकडे गतवेळच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विकास योजनेतून अंकलगी रोडलगत प्रशस्त बाजार कठडे बांधण्यात आले आहेत. तेथे अगदी विक्रेत्यांना बसायला कठडे,ग्राहकांसाठी पेग्विन बॉल्क असे सर्वसोयीयुक्त बांधकाम करण्यात आले आहे.गावातील रस्त़्याकडेला बसणारे सर्व विक्रेर्ते बसू शकतील अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे.
परिसरातील सनमडी, कुलाळवाडी, राजोबाचीवाडी, आंसगी-जत, मायथळ,घोलेश्वर,सोन्याळ,यास माडग्याळी शेळी-मेंढी बाजारासाठी तालुकाभरातील शेतकरी आपल्या शेळ्या-मेढ्या विक्रीसाठी आणतात.त्यामुळे प्रंचड गर्दी बाजार दिवशी असते.इतर दिवशीही अशी गर्दी मुख्य रस्त्यावर असते.त्यातच वाढलेली अतिक्रमणे,रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वडापच्या गाड्या,बेशिस्त दुचाकी लावल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
तालुका करण्याची मागणी असलेल्या अशा व्यक्त करताना विकास-व गावातील सुख-सुविद्या देण्याची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाची हतबलता नागरिकांच्या जिवावर बेतणारी ठरत आहे. याकडे उमदी पोलिस,बांधकाम विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करून कोणत्याही दबाव व्यक्तिरित कारवाई करून जत-चडचडण मार्ग मोकळा करावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
गत अनेक वर्षापासून येथे ग्रामपंचायती कडून प्रशस्त बाजार कठडे बांधण्यात आले आहेत. तेथे बाजार बसवून गावातील गर्दी कमी करण्याचा स्वच्छ उद्देश ठेवण्यात आला होता. मात्र गेल्या अनेक वर्षापासून गावातील अतिक्रमणे,भाजीपाला व्यापारी हलविण्यात ग्रामपंचायतीचे निवडणूकीपुर्वी शड्डू ठोकून गाव विकासाची वल्गना करणारे लोकप्रतिनिधी चिडीचूप आहे हे विशेष…माडग्याळ ता.जत येथे शासनाचे 25 लाख खर्चून बांधलेले प्रशस्त बाजार कठडे बिनकामाचे बनले आहेत.





