खंडनाळ-पांढरेवाडी बोर नदीवरील बंधाऱ्यांसाठी 76 लाखाच्या निधीस मंजूरी :सरदार पाटील

0
6

जत,प्रतिनिधी: खंडनाळ-पांढरेवाडी ता.जत येथील बोर नदीवर कोल्हापूर बंधाऱ्यासाठी 76 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून लवकरचं दरिबडची जिल्हा परिषद मतदार संघातील जालीहाळ खुर्द, सिध्दनाथ,दरिबडची आदी गावातील नदीपात्रात कोल्हापूर  बंधाऱ्यासाठी निधी प्रस्तावित आहे.त्यासाठी लवकरचं मंजूरी मिळणार असल्याची माहिती जि.प.सदस्य सरदार पाटील यांनी दिली.
पाटील पुढे म्हणाले, जतचे आमदार विलासराव जगताप यांच्या पुढाकारातून जत तालुक्यात दुष्काळ मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यात जलयुक्त शिवार, व विविध योजनातून पाणी अडवा,पाणी जिरवा मोहिम गतीने राबविली जात आहे. खंडनाळ-पांढरेवाडी बोर नदी पात्रातील बंधाऱ्यांसाठी स्थानिक स्तर योजनेतून निधी उपलब्धं झाला आहे.
यामुळे परिसरीतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पाणी अडविल्यामुळे पाणी पातळी वाढणार आहे.
पाटील पुढे म्हणाले, दरिबडची जिल्हा परिषद निवडणूकीत आम्ही दिलेली आश्वासनाप्रमाणे दुष्काळी मुक्तीसह रस्ते मजबूतीकरण,आमदार फंडातून सभागृह, समाजमंदिरासाठी निधी उपलब्धं होत आहे. मतदार संघातील सर्वागिंन विकासासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. या मतदार संघातील ग्रामपंचायती सक्षम करून त्या माध्यमातून विकास योजना राबविल्या जात आहेत.कायमस्वरूपी पाणीटंचाई सपावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.त्यातून एक कोल्हापूर पध्दतीचा बंधारा मंजूर झाला आहे. यापुढील गावासाठी अन्य तीन बंधाऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहेत. आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून त्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरचं त्यासाठी निधी उपलब्धं होणार असल्याचे पाटील यांनी शेवटी सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here