जत,प्रतिनिधी:वाढते तापमान, बेबंद पाणी उपसा, भूगर्भातील घटलेला पाणीसाठा यामुळे जत तालुक्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: पूर्व भागातील जवळपास पन्नासवर गावे टंचाईच्या चटक्यांनी हैराण झाले आहेत. तालुक्यातील जवळपास 50 भर गावात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.6 गावांना अधिग्रहन केलेल्या विहिरी,कुपनिकेतून पाणी पुरवठा सुरू आहे. तर 16 गावाची टँकरची मागणी करण्यात आली आहे.
तलावातील पाणीसाठा घटला आहे. पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे. पिके होरपळू लागली आहेत. जनावरांचे हाल सुरू आहेत. म्हैसाळ पाणी योजनेतून पाणी सतत सोडणे आवश्यक असताना शासन व प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे. त्यामुळे जत तालुक्यात उन्हाळा कडक जाणार, अशी स्थिती आहे.मागील वर्षी जत तालुक्यावर वरूणराजाची कृपा झाल्याने यंदा तालुका महादुष्काळाच्या खाईतून बाहेर आला आहे.ऑगष्ट महिना संपला तरीही तालुक्यात अद्याप एकाही ठिकाणी टँकर सुरू झाला नाही. असे असले तरी सध्या तालुक्यातील 50 भर गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.तालुक्यातील बागलवाडी,माणिकनाळ,माडग्याळ,तिं
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे तालुक्याच्या पश्चिम भागाचे चित्र काही प्रमाणात बदलले आहे. मागील वर्षी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. त्यामधून कुंभारी, कोसारी, बागेवाडी, गुळवंची, कंठी, बिरनाळ, शेगाव, तिप्पेहळ्ळी, बनाळी, वाळेखिंडी या भागातील तलाव भरून घेण्यात आले होते. तो पाणीसाठा आता संपुष्टात आला आहे. कृष्णा नदीच्या पाण्यावर शेतकर्यांनी फळबागा व नगदी पिके घेतली आहेत. यावर्षी पाणी सोडण्याची चिन्हे दिसत नसल्याने पश्चिम भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही या भागात गंभीर झाला आहे. टंचाईग्रस्त गावे :
तालुक्यातील काही गावांना नेहमीच उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. त्यामध्ये उमदी, डफळापूर, बिळूर, तिकोंडी, मुचंडी, माडग्याळ, गुड्डापूर, उमराणी या मोठ्या गावांचाही समावेश आहे. प्रशासनाने टंचाईमध्ये 27 गावांचा समावेश केला आहे. त्यामध्ये जिरग्याळ, मिरवाड, शिंगणापूर, कुडनूर, लकडेवाडी, अमृतवाडी, सनमडी, मायथळ, टोणेवाडी, वज्रवाड, बसर्गी, खिलारवाडी, येळदरी, गूगवाड, सिंदूर, एकुंडी, वळसंग, बागलवाडी, बेळुंखी, बाज याही गावांचा समावेश आहे.प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करावा, अशी जनतेची मागणी आहे.
येथे आहे पाणी टंचाई
अधिग्रहन केलेल्या विहिरी कुपनिकेतून पाणीपुरवठा होणारी गावे;बागलवाडी,माणिकनाळ,
माडग्याळ,तिंकोडी,शिंगणापूर,कोणबग्गी
टँकर मागणी केलेली गावे;कोतेबोबलाद, अंकलगी,व्हसपेठ, सोन्याळ,हळ्ळी, अचकनहळ्ळी, कोनबगी, काराजनगी, सोनलगी,अंतराळ,माडग्याळ, आंसगी-जत,तिल्याळ, पांढरेवाडी,लमाणतांडा(द),दरिबडची
जत तालुक्यातील शेगाव साठवण क्र.2 पुर्ण कोरडा पडला आहे.माडग्याळ सह परिसरातील पाणी टंचाई व चारा टंचाईमुळे जनावरे भोड्या माळरानावर चाराचा शोध घेतानाचे ह्रदयद्रावक चित्र







