शहर स्वच्छता,वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य : मुख्याधिकारी अभिजित हराळे

0
7

जत,वार्ताहर:जत शहरात केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत जत नगर परिषदेच्या वतीने संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेत जत शहरातील नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी स्वंयप्रेरणाने योगदान द्यावे असे आवाहन जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे व नगराध्यक्षा सौ.शुभांगी बन्नेनवर यांनी केले.

         जत नगरपरिषदेचा कार्यभार घेतल्यानंतर आज श्री.हराळे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,एसटी स्टँड परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली.यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी स्वच्छता मोहीम 2019 साठी जत नगरपरिषदेने भाग घेतला अाहे.चार जानेवारीपासून या कामाच्या पाहणीला सुरूवात होईल.स्वच्छ जतसाठी आतापासूनच करावे लागणार आहे. त्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून नागरिकांनी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा. ओला कचरा,सुका कचरा,घातक कचरा असे वर्गीकरण करुन व्यवस्थापन करावे. शौचालयचा नियमीत वापर केला पाहिजे.जत नगरपरिषदेच्या वतीने घंटा गाडीचा उपयोग करून शहरातील प्रत्येक घरातील कचरा गाडीतून उचलला जाईल याकडे नगरपरिषद विशेष लक्ष देणार आहे.कचरा उचलण्यासाठी नवीन टेंडर निघेपर्यंत जुन्याच टेंडर कंपनीकडून कचरा उचलण्याची सोय करण्याचे आदेश दिले आहेत. स्वच्छ व सुंदर जत करण्यासाठी शहरातून जनजागृतीसाठी फेरी करण्यात येणार अाहे. यासाठी महिला बचतगट,विविध मंडळे,सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. स्वच्छता अॅप सुरू करणार आहोत. या अॅप वरती ज्या ठिकाणी कचरा असेल त्याची माहिती या इन्स्टॉल केल्यास यांची तातडीने दखल घेऊन नगरपालिका स्वच्छता विभाग तेथे पोहचून कचरा तातडीने उचलला जाईल. हराळे म्हणाले की,प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत नगरपरीषदेकडे अठराशे अर्ज प्राप्त झाले असून,त्यांची छाननी सुरू आहे.शहरात ज्या ठिकाणी डिजिटल लावलेले आहेत ते नगरपरिषदेच्या वतीने 25 डिजिटल काढले असून येत्या काही दिवसात शहरातील वाहतुकीचा विस्कळीतपणा सुरळीत करण्याच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. जत स्वच्छ व सुंदर जतसाठी संपूर्ण नगरपरिषदेची टीम काम करेल असा दावा हराळे यांनी केला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here