जत,प्रतिनिधी: बिंळूर ता.जत येथील पाणी योजनेच्या पाईपलाईनची जुने बिल 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून काढण्यात येत आहेत. ज्यावेळी दोन्ही पक्षांनी एकत्रित सत्ता होती. त्यावेळी नागरिकांची पाणी टंचाईतून मुक्ती करण्यासाठी तसा ठराव करून घेऊन तात्पुरत्या उधारीने पाईप घेण्यात आल्या आहेत.त्याचे अद्याप पर्यत बिल काढलेले नाही.
त्यामुळे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत.अनेक वर्षाची सत्ता खालसा झाल्याने नैराश्यातून ग्रामपंचायतीची बदनामी करण्याचे उद्योग सुरू असल्याचा आरोप जेष्ठ नेते रामाण्णा जिव्वाणावर, संरपच नागनगोंडा पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.यावेळी माजी सभापती प्रकाश जमदाडे, बसगोंडा जाबगोंड, इराप्पा कामगोंड, महादेव धोंडमनी,आण्णासो गडीकर आदी उपस्थित होते.
जिव्वाणावर व पाटील पुढे म्हणाले, गत मार्च-एप्रिल मध्ये गावात तीव्र पाणी टंचाई होती.त्यावेळी ग्रामस्थांना तातडीने पाणी देणे गरजेचे होते.त्यामुळे सर्वानुमत्ते ठराव होऊन दर्जेदार पाईप टाकत सुमारे 8 हाजार फुट पाईपलाईन टाकण्यात आली आहे.त्यावेळी टाकलेल्या पाईपलाईनसाठी 4 लाख 57 हाजार रूपयाच्या पाईप उधारीवर आणून पाईपलाईन टाकली आहे. त्यातून सध्या गावाला पाणी पुरवठा सुरू आहे.त्यानंतर निवडणूक झाल्याने ते पैसे रखडले होते.खर्ची पैसे आता 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून काढण्यात येत आहेत. त्यामुळे त्यात कोणाताही भष्ट्राचार अथवा डब्बल पैसे काढण्याचा प्रकार नाही.
ते म्हणाले, गेल्या तीस वर्षापासून सत्तेत असणाऱ्या विरोधकांच्या भानगडी मोठ्या आहेत.त्यांना पैसे देणारा ठेकेदार भेटला नाही, म्हणून अडीच कोटीची भारत निर्माण योजनेचा निधी परत घालविला आहे.त्यामुळे नागरिकांना दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला असे जावे लागते.
सलग तीस वर्षाच्या मनमानी कारभारा वैतागलेल्या जनतेनी त्यांना गावातील सर्व सत्ताकेंद्रात बाजूला ठेवले आहे.आमच्या स्वच्छ,पारदर्शी कारभारावर विश्वास ठेवून जनतेनी आम्हाला सत्तेत आणले आहे. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गतीने कामे सुरू आहेत. स्वच्छता,शाळाचे परिसर सुंदर करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या अनेक विकास योजनाचे नियोजन आहे.त्यामुळे भविष्यात आपले उरले-सुरले राजकीय आस्तित्व संपेल या भितीने विरोधी गटाकडून बिनबुडाचे आरोप होत आहेत. आम्ही स्वच्छ आहोत.जनहितासाठी काम करत आहोत. त्यामुळे जनता आम्हच्या पाठिशी आहे असेही यावेळी जिव्वाणावर व पाटील यांनी स्पष्ट केले.
बिंळूर मध्ये गेल्या तीस वर्षात जेवढी कामे झाली नाहीत.तेवढी आम्ही दोन महिन्यात केली आहेत. बोगस बिले काढण्याचा प्रश्नचं नाही.तसे विरोधकांनी सिध्द करावे आम्ही राजीनामा देतो असेही यावेळी जिव्वाणावर व पाटील यांनी आवाहन केले.





