जत,प्रतिनिधी : खलाटी ता.जत येथे आजोबाला मारहाण करणाऱ्या पुतण्याला मज्जाव करणाऱ्या काकाला पुतण्याने गंभीर मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद जत पोलिसात दाखल झाली आहे.
अधिक माहिती अशी, पुतण़्या खंडू सिंध्दू नाईक हा आजोबा आबा नाईक यांना किरकोळ कारणावरून मारहाण करत असताना काका नामदेव आबा नाईक त्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेला असता पुतण्या खंडू यांने काका नामदेव यांना काठी,लाथाबुक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. त्यांची फिर्याद नामदेव नाईक यांनी जत पोलिसात दिली आहे .





