जतेत गणेशोत्सव व मोहरमच्या पाश्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक
जत,प्रतिनिधी : डिजे लावणाऱ्यांना गणपती बाप्पाची शपथ आहे.गणेशोत्सवात कायदा,संस्कृती व धार्मिक प्रदूषण न करता शांततेत गणेशोत्सव साजरा करा गणेशोत्सव काळात अनावश्यक खर्च टाळून ते पैसे तहसीलदार यांच्याकडे देऊन जत तालुक्यात शेती संमृध्द करण्यासाठी दहा बंधारे बांधू असे प्रतिपादन
अप्पर पोलीस अधिक्षक शंशिकात बोराडे यांनी केले.
जत पोलिसाच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरम 2018 ची शांतता कमिटीची बैठकीत बोराडे बोलत होते.यावेळी तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, पोलीस निरिक्षक राजू तहसिलदार,प्रकाश गायकवाड, मुख्याधिकारी अभिजित हराळे,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,अॅड.प्रभाकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
बोराडे पुढे म्हणाले, गणेशोत्सव काळात जुन्या खेळाच्या स्पर्धा भरवून ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहण्यासाठी मदत होईल.पाश्चात संस्कृतीचे अनुकरण करून पिड्या बाद करू नका,गणेशोत्सव व मोहरम हिंदू-मुस्लिम ऐक्यातून धार्मिकता संपवा.गणेशोत्सव काळात पन्नास टक्के पैसे वाचवून ते पैसे तहसीलदार यांना देऊन जत तालुक्यात दहा बंधारे बांधून पाणी अडवा,डिजे,डॉल्बी ला फाटा देत समाजाला पुढे घेऊन जाणारे व्याख्याते आणा व समाजात परिवर्तन घडवा.गत काही काळात डॉल्बी,संस्कृती,नैतिकतेत प्रदूषण झाले आहे. धार्मिकेत वेगवेगळ्या गोष्टीत प्रदूषण झाले,ते टाळणे गरजेचे आहे.जुने खेळ,लेझिम,फुगडी,कब्बड्डी,खो-खो
पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार म्हणाले, डॉल्बीमुळे विघ्नहर्ता गणपतीच्या विघ्न आणू नका,न्यायालयाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाईल,डॉल्बी लावल्यास गुन्हा दाखल होऊन नाहक तरूणाचे आयुष्य उद्धवस्त होईल.त्यामुंळे शांततेत व डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करा.डॉल्बीला पर्याय म्हणून पारंपरिक वाद्ये लेझीम,ढोलताशा,झांजपथक,अशाचा वापर करा. आवाजाची मर्यादा पाळावीच लागेल,डॉल्बीमुळे ह्रदय,कानाचे आजाराने अनेकाना अपंगत्व आले आहे.त्यामुळे तरुणाईने डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करा.डॉल्बी लावल्यास गुन्हे दाखल होतिल.
तहसिलदार सचिन पाटील म्हणाले, सण साजरा करताना न्यायालयाचा निर्णय व प्रशासनाचा आदेशानुसार गणेशोत्सव साजरा करून सहकार्य करा.एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले.
फोटोओळी: जत येथील शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना अप्पर अधिक्षक शंशिकात बोराडे, बाजूस,तहसीलदार सचिन पाटील,बिडिओ अर्चना वाघमळे,मुख्याधिकारी अभिजित हराळे,पो.नि.राजू तहसिलदार आदी मान्यवर उपस्थित होते.
Attachments area





