कवटेमहांकाळ : बेंळगाव जिल्हा कराटे आणि किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या विद्यमाने अथणी येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे आणि बॉक्सिंग स्पर्धेत मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी 4 सुवर्ण,3 रौप्य तर 5 कास्यपदके मिळवून शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर कोरले.
संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून या स्पर्धेसाठी खेळाडू आले होते.आपली खिलाडूवृत्ती आणि क्रीडा कौशल्य दाखवत मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परराज्यातही वेगळा दबदबा निर्माण केला.आयुष सुधाकर बंडगर याने 2 सुवर्णपदके, वैभव विजय पवार याने 1 सुवर्णपदक,1 रौप्य पदक, सूरज बंडू कोकरे याने 1 सुवर्ण पदक,1 कांस्य पदक, वेदांत वैभव पाटील याने 1 रौप्य पदक,शरयु युवराज माळी हिने 2 कांस्यपदके, भक्ती दीपक बंडगर हिने 1 कांस्यपदक, स्नेहा सुरेश भोसले हिने 1 कास्यपदक तर अनुज खंडू कोकरे याने 1 रौप्यपदक पटकाविले.या खेळाडूंनी पदार्पणातच आपल्या खिलाडू वृत्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले प्रयत्नांची पराकाष्टा करीत घवघवीत यश संपादन केले.या सर्व खेळाडूंना मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मोहन माळी, प्राचार्या सौ.कविता मेहरा,क्रीडा शिक्षक श्री.बिरादार,अरुण अब्राहम यांचे प्रोत्साहन लाभले. सर्व पदक विजेत्या चमकणार्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक अप्पासाहेब तांबे व किरण कचरे यांनी केले.
मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचा यशस्वी विजेता कराटे संघ





