
जत,प्रतिनिधी:उमदी, माडग्याळ, संख, दरिबडची, मुचंडी,उमराणी,बिळुर,बसर्गी,डफळापूर (ता.जत ) यासह अनेक गावांतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी 2017 च्या खरीप हंगामातील पिक विम्याचा हप्ता भरूनही अनेक शेतकऱ्यास खरिप हंगामाचा पीक विमा मिळालेला नाही.काही गावात तीस टक्के शेतकऱ्यां विम्याची रक्कम मिळाली आहे. मात्र 70 टक्के शेतकरी वंचित राहले आहे.त्यांना तातडीने विमा रक्कम द्यावी अशा मागणीचे निवेदन संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिले.निवेदनात पुढे म्हटले आहे की,वचिंत शेतकरी बँकेत हेलपाटे घालत आहेत. मात्र तुम्हची नावे नाहीत म्हणून बँकेतून सांगितले जाते.तर त्याच गावातील काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले आहेत. असे अन्यायकारक पिक विमामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे वचिंत शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा रक्कम मिळावी.
जत तालुक्यातील पिक विमा वचिंत शेतकऱ्यांना मिळावा या मागणीचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.