तहसीलदार अभिजित पाटील यांना निरोप,सचिन पाटील यांचा सत्कार
जत,प्रतिनिधी:जतच्या दुष्काळी तालुक्यात चांगले काम करणाऱ्या तहसीलदार अभिजित पाटील यांच्या सारख्या चांगल्या अधिकाऱ्यांची उणिव भासेल अश खंत आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केली.
जतचे तहसिलदार अभिजित पाटील यांचा बदली झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार व निरोप समारंभात आमदार विलासराव जगताप बोलत होते.
तहसीलदार अभिजित पाटील यांची माळशिरस येथे बदली झाल्याबद्दल मानपत्र देत सहकुंटूब आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते जतच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, नुतन तहसीलदार सचिन पाटील,पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार,मुख्याधिकारी अभिजित हराळे,नायब तहसीलदार नागेश गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले,मुर्ती लहान पंरतू किर्ती महान अशा पध्दतीने पाटील यांनी काम केले आहे.दुष्काळ हटविण्यासाठीचे काम अधिकाऱ्यांनी करायचे आहे.त्यासाठी पाटील यांनी प्रयत्न केला.नव्या अधिकाऱ्यांनी कायदा आणि व्यवहार असे काम करून जतला आदर्श करण्यासाठी प्रयत्न करावा.जतला अधिकारी येताना नको म्हणतात.मात्र आमच्या जनतेच्या प्रेमळपणामुळे अधिकारी जायला इच्छुंक नसतात.हेही खरे असल्याचे आ.जगताप शेवटी म्हणाले.
प्रांताधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले,रक्त सांडणारा व घाम गाळणारा एक अधिकारी म्हणून पाटील यांनी तालुक्यात काम केले.तहसीलदार पाटील आईच्या मायेने काम करतो,त्यांनी बाबाच्या धाकाच्या पध्दतीनेही काम केले पाहिजे.शिकलेले आंमलात आणल्याशिवाय काम करता येत नाही.जनतेशी नाळ जोडून तहसीलदार पाटील यांचे काम नव्या अधिकाऱ्यांना आदर्शवत आहे.
माजी सभापती प्रकाश जमदाडे म्हणाले,या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी जनतेला न्याय देऊ नका मात्र अन्यायही करू नका,तहसीलदार पाटील सारख्या अधिकाऱ्यांनी कायदा व नियमाची सांगड घालून काम काम केले.तालुक्यात काम केलेला अधिकारी इतर ठिकाणी सक्षम होतो.प्रांताधिकारी म्हणून तीन वर्षानंतर पाटील यांनी जतला यावे.
पो.नि.तहसिलदार राजू तहसिलदार म्हणाले, आम्ही सक्षम अधिकारी आहोत.म्हणून दुष्काळी जत तालुक्यात आंमची नेमणूक झाली आहे.जनतेचा अशिक्षित पणा आहे,मात्र त्यांच्या चांगुलपणाबरोबर चांगले काम करावे लागते.
विक्रम ढोणे म्हणाले, जतच्या अधिकाऱ्यांचे आतापर्यत ठेकेदाराकडून निरोप समारंभ झाले. पहिला सत्कार जनतेकडून झाला.अधिकाऱ्यांचे धोरणही जनतेच्या अडचणी वाढवू शकतात.सक्षम कार्य करून प्रामाणिक जनतेची कामे व्हावीत.
यावेळी नुतन तहसीलदार पाटील,पो.नि.तहसिलदार, नायब तहसीलदार गायकवाड, मुख्याधिकारी हराळे,पुरवठा अधिकारी श्री.गोठणे,पानी फांऊडेशनचे तुकाराम पाटील आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
जातात केलेल्या कामाची व जनतेच्या सहकार्यवर पाटील यांनी कवितेतून कृतृज्ञता व्यक्त केली.
“रोखण्यात वाट माझी वादळे,
झालीत अतूर.
डोळ्यात गेली जरी धुळ,
थांबण्यास उसंत नाही.
येतील वादळे खेटेल तुफान,
तरी चालतो वाट माझी.
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पाऊलास पंसत नाही.”
– अभिजित पाटील,तहसीलदार, माळशिरस
जतचे तहसीलदार अभिजित पाटील यांचा बदली निमित्त मानपत्र,शाल,श्रीफळ देत सहकुंटूब सत्कार करण्यात आला.





