जत | बाजार समितीच्या डांळिब सौदा हॉलचा पायाभरणी शुभांरभ |

0
23

जत,प्रतिनिधी : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार यांच्या जनावरे बाजार आवारातील डाळींब सौदा हॉलचा पायाभरणी समारंभ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
       या कार्यक्रमासाठी  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,आमदार विश्वजित कदम,आमदार सतेज पाटील,आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, विक्रमसिंह सावंत, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर,आप्पराया बिराजदार,अभिजित चव्हाण, रामगौंडा संती,पी.एम.पाटील, आकाराम मासाळ,जि.प.सदस्य महादेव पाटील,नाथा पाटील,दिग्विजय चव्हाण,रविंद्र सावंत, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, इकबाल गवंडी, साहेबराव कोळी, महादेव कोळी, निलेश बामणे,भैय्या कुलकर्णी, ईराण्णा निडोणी, नाना शिंदे, राजू माने, सलीम पाच्छापूरे,काका शिंदे,अशोक बन्नेनवर,मुन्ना पखाली आदी मान्यवर उपस्थित होते .
50×100 आकाराच्या चार हॉलचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी 85 लाख रुपये निधीची तरतुद करण्यात आली आहे.सदरचे काम येत्या एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.डाळींब सौदा सध्या आडत परिसरातील बसवेश्वर हॉलमध्ये केला जात आहे.ही जागा कमी पडू लागल्यामुळे बाजार समितीने जनावरे बाजार परिसरात या हॉलचे बांधकाम करून तेथे डाळींब सौदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती बाजार समिती सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी यानी दिली आहे.

जत: जत राजे विजयसिंह डफळे दुय्यम आवाराच्या डांळिब सौदा हॉलचा पायाभरणी शुभांरभ प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यंमञी पृथ्वीराज चव्हाण आ.विश्वजित कदम,विक्रमसिंह सांवत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here