शिक्षक दिनानिमित्त गुरुवारी बोर्गीत पुरस्कारांचे वितरण
बेंळोडगी,वार्ताहर;शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून शाळा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा तालुक्यातील बोर्गी येथील सहारा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तथा सहारा ग्रुपच्या वतीने सन 2018 सालाकरिता जत तालुक्यातील 28 केंद्रातील प्रत्येकी एक असे 28 शिक्षकांना “आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.येत्या गुरुवारी सहा तारखेला बोर्गी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरुस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती सहारा ग्रुपचे अध्यक्ष दावल पुळूजकर यांनी दिली.
जत तालुक्यात एकूण 28 केंद्रे आहेत.या केंद्रातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे नाव व केंद्र याप्रमाणे आहेत
जत कन्याशाळा संभाजी कोडग, अचकनहळ्ळी रामराव मोहिते, निगडीखुर्द शिवराम यादव, बनाळी वसंत यादव,वाळेखिंडी संजय कापसे, सनमडी प्रल्हाद हुवाळे, शेगाव सौ.जयश्री चौगुले,आवंढी सोमनाथ केदार, बाज ज्ञानेश्वर कोळी, डफळापूर भाऊसो महानोर, जिरग्याळ मच्छिंद्र ऐनापुरे, कुंभारी राजेंद्र गुट्टे ,बिंळूर भिमू पुजारी, दरीबडची शिवाप्पा राठोड, को.बोबलाद कुमार बिरादार, असंगीतुर्क शिवगेनी नरळे,उमदी प्रकाश व्हनमुखे,गुड्डापूर प्रकाश माळी, वळसंग सिद्धेश्वर कोरे, खोजनवाडी धरेप्पा कट्टीमनी, जाडरबोबलाद रेवनसिद्द चिकलगी, उटगी सिकंदर शेख,सिंदूर मुरगेश कुमारमठ, मुचंडी कन्याकुमारी पाटील, संख महानंदा बिरादार, गिरगाव लक्ष्मण अंकलगी, बोर्गी बसय्या मठपती, तिकोंडी चंद्रशेखर कारकल या शिक्षकांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून सहारा ग्रुपने आदर्श शिक्षक पुरस्कारासह रक्तदान,आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.बोर्गी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ होणाऱ्या या कार्यक्रमास बालगाव आश्रमाचे प.पज्यू.अमृतानंद महास्वामीजीं यांच्या दिव्य सानिध्य लाभणार आहे.आमदार विलासराव जगताप, शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी-पाटील,जिल्हा परिषद सदस्य विक्रमसिंह सावंत, डॉ.रवींद्र आरळी,पंचायत समितीच्या सभापती मंगलताई जमदाडे,संखच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा बागेळी,पंचायत समिती सदस्य अॅड.आडव्यापा घेरडी,कविता खोत, लता कुलोळी,धारेप्पा हत्तळी,अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड,उमदीचे सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे तर प्रमुख वक्ते म्हणून नुतन गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह पूर्वभागातील सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थिती असणार आहे.
तालुक्यामधून 2017-18 साठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एखाद्या शिक्षकाचे शाळेतील काम चांगले असूनही अशा आदर्श पुरस्कारापासून वंचित व दुर्लक्षित राहावे लागते.ती खंत दुर करावी,शिक्षकांच्या चांगल्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी शाळा,विद्यार्थ्याच्या उन्नत्तीसाठी काम करणाऱ्या अशा शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक अशा 28 शिक्षकांना सहारा ग्रुपचा “आदर्श शिक्षक” पुरस्कार दिला जाणार आहे. आदर्श शिक्षक निवडण्यासाठी एक तज्ञ निवड समिती गठीत करण्यात आली आहे.या समितीने शिफारस केलेल्या नावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहितीही पुळूजकर यांनी दिली.तालुक्यातील शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच जतमधून डॉक्टरांचे एक तज्ञ पथक आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी खास उपस्थित राहणार अाहे.वेगवेगळ्या आजारावरील उपचारासाठी गरीब व गरजू रुग्णांनी लाभ मिळावा म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णाची तपासणी करून उपचार केले जाणार आहे. गरजुनी आरोग्य शिबीसाठी व रक्तदान शिबीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन सहारा ग्रुप व बोर्गी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरस्कारासाठी फाईल नाही,थेट शाळेतील कामे पाहून पुरस्कार
हे पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या निवडी वैशिष्ट्यपुर्ण केल्या आहेत. इच्छुकं शिक्षकांकडून फाईलप्रस्ताव न घेता त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षकाने प्रत्यक्षात केलेले उल्लेखनीय कामाचे मुल्यमापन करण्यात आले आहे. यात विद्यार्थी गुणवत्ता विकास, विविध शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा मधील निकाल, डिजिटल वर्ग खोल्या, स्वच्छ शाळा व सुंदर शाळा मधील सहभाग तसेच शाळेत पालकांचा सहभाग,शाळेतील भौतिक सोयी-सुविधा,खोल्या सजावट,बोलक्या भिंतीतील विविधता, विविध सहशालेय उपक्रमामध्ये शाळेचा सहभाग इत्यादी बाबी अप्रत्यक्षपणे तपासून व समजावून घेऊन आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.