जत,प्रतिनिधी : भाजपच्या भूलथापांना जनता कंटाळली असून जतमध्ये आता काँग्रेसचाच आमदार कॉग्रेसचाच असेल, खंबीर व युवा नेते विक्रमसिंह सांवत हे कॉग्रेसचे उमेदवार असतील, अशी घोषणा माजी मुख्यंमञी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा रविवारी जतेत दाल झाली. यावेळी मार्केट यार्ड येथे सभेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यंमञी पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अनुसुचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, महिला आघाडीच्या चारूताई टोकस, आ.मोहनशेठ कदम, आमदार डॉ. विश्वजित कदम, पक्षप्रवक्ते सचिन सांवत, आ.बसवराज पाटील, विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बाजार समिती सभापती दिनकर पाटील, दयगोंडा बिराजदार, संतोष पाटील, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर. पी. एम.पाटील, बाबासाहेब कोडक, संचालक अभिजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. तर व्यासपीठावर राज्यातील काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात सर्वच नेत्यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली.
खा. चव्हाण म्हणाले, जत तालुक्यात काँग्रेसची मोठी ताकत आहे. जतचा सर्वागिण विकास करण्यासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या सांवत यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी असेल. जतची जागा ही काँग्रेसचीच असेल, त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. गतवेळी कॉग्रेसच्या विक्रम सांवत यांना 57 हजार व राष्ट्रवादीच्या प्रकाश शेंडगे यांना 27 हजार मते मिळाली होती. येत्या निवडणूकीत सांवत 85 हजाराहून अधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास खा. चव्हाण यांनी व्यक्त केला.
जतच्या पुर्व भागातील म्हैसाळ योजनेपासून वंचित राहिलेल्या गावासाठी कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी काग्रेसचा आमदार निवडून द्या. शेजारच्या कर्नाटकात काँग्रेस सरकार अाहे. कर्नाटकचे नेते मल्लीकार्जून खरगे हे महाराष्ट्र प्रभारी आहेत. त्यांना सोबत घेऊन तुरची बबलेश्वर योजना मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेऊ,असे खा.चव्हाण म्हणाले.
त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, सरकार झोपेचे सोंग घेत आहे. आम्ही या सरकारच्या कामगिरीचा पर्दाफाश करित आहोत. ‘हम आगे बढेंगे, आप साथ रहेंगे’.शिवसेना आणि भाजपचे मंत्री रस्त्यांतील खड्ड्यांची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. आधा-आधा मिल-बाटके खायेंगे, असे त्यांचे सुरू आहे. त्यामुळे शिवसेनाही या कारभाराला भाजपइतकीच जबाबदार आहे. महाराष्ट्रावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यंदा पाऊस चांगला पडला असूनही पेट्रोल, डिझेलवर दुष्काळ अधिभार अजून घेतला जात आहे. देशात सर्वाधिक पेट्रोल, डिझेलचा दर राज्यात आहे. सरकारकडे द्यायला पैसेच शिल्लक नाहीत. सरकार कसे चालवायचे असते, हे या लोकांना माहीत नाही. हे निकम्मे सरकार आहे. म्हणूनच आम्ही या सरकारला फसवणीस सरकार म्हणतो. शेतकर्यांना कर्जमाफी अजूनही मिळत नाही. मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे 58 मोर्चे काढले. कुठेही गालबोट लागले नाही. आता लोकांची सहनशीलता संपली. प्रश्न स्फोटक होत आहेत. असे असताना सरकार तोंडाला गुळाचे बोट लावत आहे. मराठा समाजाला इतर समाजापासून तोडण्याचे काम करत आहे. आम्ही मराठा, मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला चालू करता येत नाही. भाजप सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही जबर आहे, याची गेंड्यालाही लाज वाटत असेल. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हीच भाजपची नीती आहे. खोट्या आश्वासनांवर जनतेला फसवण्याचे काम सुरू आहे. फक्त जाहिरातबाजी हाच एककलमी सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. शेतकरी, तरुणांसह समाजातील सर्व घटकांत सरकारविरोधात असंतोष खदखदत आहे. याला भाजपइतकीच शिवसेनासुद्धा जबाबदार आहे. भयमुक्त महाराष्ट्र आणि भाजपमुक्त भारत निर्माण करण्यासाठी 2019 मध्ये या सरकारचे सर्वांनी मिळून विसर्जन करू या. निवडणुका कधीही होऊ देत, काँग्रेस पक्ष निवडणुकीस तयार आहे, असे सांगत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
माजी मुख्यंमञी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2019 साली मोदीची देशात सत्ता येणार नाहीच.परंतु पुन्हा मोदीला निवडून देण्याची चूक केली तर देशात, लोकशाही,मतदान व डॉ.आंबेडकर यांचे संविधान पहायलाही मिळणार नाही.
विश्वजित कदम म्हणाले, जनसामान्यांचे शोषण करणार्यांच्याविरोधात हा जनसंघर्षाचा उठाव आहे. त्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून होत आहे. महापालिका निवडणुकीत राज्यभरातील नेत्यांनी पाठबळ दिले. पण सांगलीत आमच्यातीलच मतभेदामुळे पराभव झाला हे मान्य आहे. भाजपचा हा विजय आम्हाला जिव्हारी लागला आहे. पण आम्ही यापुढे हे मतभेद दूर ठेवून सांगली लोकसभा आणि पाठोपाठ सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवू.जत शहरातून रँली काढण्यात आली.तालुक्यातील सुमारे पाच हाजारावर लोंकानी या सभेला गर्दी केली होती. कॉग्रेसचे झेंडे,मोफलर,आदी साहित्यामुळे वातावरण क्रॉग्रेसमय झाले होते. तालुक्यातील झाडून पदाधिकारी उपस्थित होते.
विक्रमसिंह सांवत यांच्या उमेदवारीची घोषणा
प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी जतची विधानसभेची जागा कॉग्रेसची असल्याने विक्रमसिंह सांवत हेच कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असतील हे घोषित केल्याने सर्व चर्चाना पुर्ण विराम मिळाला.घोषणेनंतर सभेत एकच जल्लोष झाला.कार्यकर्त्यानी आता कामाला लागावे राज्यात कॉग्रेसचे सरकार आणण्यासाठी सांवताना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अशोकराव चव्हाण,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केले.
जत येथे आलेल्या संघर्षयात्रेत बोलताना माजी मुख्यंमञी तथा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, व्यासपिठावर माजी मुख्यंमञी पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील,आ.मोहनशेठ कदम,विश्वजित कदम,सतेज पाटील,विक्रमसिंह सांवत व मान्यवर