जत | मध्ये पिस्तूल तस्करी : तिघे जेरबंद |

0
9

जत, प्रतिनिधी :कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातून जतमध्ये गावठी पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बाज,(ता. जत)मधील दोघांचा समावेश आहे.
एलसीबीचे कर्मचारी नारायण डवरे यांनी जत पोलीसांत फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विकास प्रकाश बंडगर,वय,22, इरफाऩ उर्फ विरूपाक्ष रमेश दुगाणे, वय,23, (दोघे रा. बाज) व संगाप्पा निर्गुणे, (रा.दादगी,जि.बिदर,कर्नाटक) यांचा समावेश आहे.
गुरूवार,दि.30 रोजी संध्याकाळी 6 वाजता सोनलकर चौक,जत येथे एलसीबीने सापळा रचून कारवाई केली.
कर्नाटकातील तस्कर संगाप्पा हा सोनलकर चौकात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीने सापळा रचला होता.विकास बंडगर व विरुपाक्ष दुगाणे हे पिस्तुल विकत घेत असताना पोलिसानी अटक केली.
त्यांच्याकडून 40 हजार किंमतीचे गावठी पिस्तुल,एक जिंवत काडतूस, तीनशे रूपये रोख असा 40 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत जत पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार तपास करित आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here