संख | कमलाताई पाटील यांचे निधन |

0
5

संख,वार्ताहर:संख (ता.जत)येथील कमलाताई आर.पाटील (वय-66 )यांचे अल्पशा आजाराने दि.31 रोजी शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यावर विजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.संख येथील गुरूबसव महाविद्यालयाच्या उभारणी त्यांचे मोठे योगदान होते.तसेच स्व. कमलाताई यांना “कृषीभूषण”पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
संखचे भाजप नेते माजी सभापती आर. के.पाटील सर यांच़्या कमलाताई पत्नी होते.आर.के.पाटील सर  यांच्या राजकीय क्षेत्रात त्या कायम त्यांच्या पाठिशी भक्कमपणे राहिल्या.राजकारणात पाटील सर यांच्या अनुउपस्थितीत त्या कार्यकर्त्याच्या मातोश्री प्रमाणे देखभाल करत होत्या.त्यामुळे आर.के.पाटील सर यांना एवढे मोठे राजकीय यश मिळाले होते.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,मुली,नातवंडे असा परिवार आहे.शोकाकूल वातावरणात त्यांच्या मृत्तदेहावर संख येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here