डफळापूर, वार्ताहर: बाज (ता-जत) येथे पंचायत समिती व दिवाणी न्यायालय जत यांच्या वतीने कायदे विषयी शिबिर व मोबाईल व्हॅन साक्षरता अभियान कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिस एस. ए.उपाध्ये प्रमुख उपस्थिती होते.
अॅड.एम.के.पुजारी यांनी “घरगुती हिंसाचार”,अॅड सौदागर यांनी ग्राहक संरक्षण कायदा, अॅड.आय.ओ. हादीमणी यांनी वैकल्पिक वाद निवारण,अॅड.मुंडेचा यांनी गर्भलिंग निदान,अॅड.एन.डी.गडदे ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अॅड.आय.एस.खतीब. अॅड.ए.ए. निटवे, न्यायालयीन कर्मचारी श्री.पाठक,श्री.वाघमारे.श्री. मोहिते.श्री.जमदाडे.राम मोठे,पंचायत समितीचे मदने मॅडम,श्री.कांबळे, सरपंच कमल गडदे,सर्व सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बाज ता.जत येथे तालुका विधी सेवा समिती व पंचायत समितीच्या वतीने कायदेविषयक शिबिर संपन्न झाले





