जत,प्रतिनिधी: जतचे प्रसिध्द डॉ.रविंद्र आरळी यांना मानाचा गलगले सेवा पुरस्कार घोषित झाला आहे.सांगली येथील बाळासाहेब गलगले फांऊडेशनच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात.भाजपचे प्रवृत्ते माधव भंडारी,खा.संजय पाटील, आ.सुधिर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार डॉ.आरळी यांना प्रधान केला जाणार आहे.
जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात आमुग्राल बदल करून मिरज नंतर जतचा वैद्यकीय क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यात त्यांचे मोठे श्रेय आहे.सामाजिक बांधिलकी जपत डॉ.आरळी यांचे कार्य वेगळेपण जपणारे आहे.जत शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इंग्लिश मेडियम स्कूल,नर्सिंग कॉलेज,पतसंस्था,काढून त्यांनी शेकडो हातांना रोजगार तर दिलाच शिवाय जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे वैद्यकीय क्षेत्र बळकट केले आहे. डॉ.आरळी यांचा बाळंपणाचा विभाग महिला रुग्णांना वरदान ठरला आहे.त्यात तज्ञ असणारे डॉ.आरळी यांनी लायन्स क्लब व भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षातून सामाजिक उपक्रम राबवून डॉ.आरळी हा एक मापदंड निर्माण केला आहे. आरोग्य शिबिरे, गरजूनां मोफत उपचार,देगण्या,व विविध उपक्रम राबवून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार गलगले फांऊडेशनच्या वतीने देण्यात आला आहे. समाजासाठी झटणाऱ्यां हाताना बळकंटी देण्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे फांऊडेशन वतीने सांगण्यात आले.





