माडग्याळ,वार्ताहर:
माडग्याळ (ता.जत)परिसरात लांडग्याचा धुमाकूळ घातला आहे. बुधवारी मध्यरात्री लांडग्याने एका म्हैशीवर हल्ला केला त्यात म्हैशीने प्रतिकार केल्याने लांडग्याने म्हैशीचा कानाचा लचका तोडून पळ काढला.मध्यरात्रीच्या घरासमोर बांधलेल्या शेळ्या,मेंढ्या व म्हैशीवर लांडग्याने गंभीर हल्ले करत आहे.लांडगे मानवी वस्तीत घुसत असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने यांची तातडीन दखल घेऊन लांडग्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.येथील पांडूरंग विठ्ठल सांवत यांच्या गोठ्यातील जनावरावर लांडग्याने बुधवारी मध्यरात्री हल्ला केला.त्यात म्हैशीच्या रेडकाचा कानाचा लचका तोडून पळ काढला. त्यांना हुसकावणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरही हे लांडगे धावून येत असल्याने शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. त्यातच दुष्काळातून हाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पशूधन या लांडग्यामुळे उद्ववस्त होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिताग्रस्त बनला आहे.





