गुगवाड | खोजानवाडीत निलाबिंका पौर्णिमा उत्साहात साजरी |

0
4

गुगवाड,वार्ताहर : खोजनवाडी(ता.जत) येथे राष्ट्रीय बसव दलाच्या वतीने निलांबिका पोर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी बसवपुजा बसवज्योती संजय चौगले यांच्या तर, षटस्थल ध्वजारोहण पत्रकार पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली.
आज सर्व महिलांनी प्रतिज्ञा केली पाहिजे,शरणानी व आपल्या संविधानात दिल्याप्रमाणे महिलांना स्वतंत्र देऊन त्यांना दबाव मुक्त करावे.  एम.जि.काराजनगी म्हणाले,
महात्मा बसवेश्वरांचा विचारांचा उपयोग केला तर आपल्या संविधानचा उध्देश व स्वप्नं साकार करण्यासाठी वेळ लागत नाही.
महादेव संत्ती म्हणाले, जातिभेद,महिला व पुरुष, लिंगभेद, गरीब श्रीमंत,अर्थिक भेद,असे अनेक समस्या दूर करण्यासाठी संकल्प केला पाहिजे.त्यानंतर सामाजिक ऐक्य साधता येईल.
यावेळी संगमेश हिप्परगी यांनी सामुहिक प्रार्थना केली.केंद्र प्रमुख राठोड सर,आप्पासाहेब करोली महानिंग केंपवाड, लक्ष्मीबाई काराजनगी,महादेव हालळ्ळी,श्रीशैल अर्जनगी, जयश्री मठपती, सर्व शरण उपस्थित होते.

खोजानवाडी ता.जत येथे निलांबिका पोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here