नुतन सभापती पदासाठी खलबंते जत पं.स.निवडी ; चर्चेला उधान : सभापती बरोबर उपसभापतीही बदलणार ?

0
5

जत,प्रतिनिधी: जत पंचायत समितीच्या सभापती मंगलताई जमदाडे यांनी राजीनामा दिल्याने नुतन सभापतीसाठी खलबते गतीमान झाली आहेत. सभापती बरोबर उपसभापतीचाही राजिनामा घेतला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.मात्र त्यांना मुदतवाढही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपसभापती पदाबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान निवडी संदर्भात आमदार विलासराव जगताप व राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांची गुप्त बैठक झालीे. तर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.बुधवारी आमदार विलासराव जगताप यांनी पंचायत समितीत काही जेष्ठ नेते, जि.प. व पं.स. सदस्याबरोबर चर्चा केली.अतिंम निर्णय आमदार जगताप यांचा असल्याने त्यांच्या हालचालीवर जनतेचे लक्ष आहे. नेमके ते कोणाला संधी देणार याबाबतच्या चर्चेला उधान आले आहे.सध्या सभापती पदासाठी सुशिला तावशी, कविता खोत यांची नावे चर्चेत आहेत. उपसभापती पदासाठी मनोज जगताप यांचे नाव पुढे येत आहे. एंकदरीत जत तालुक्यातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. पंचायत समितीत भाजपचे 9, कॉग्रेस 7, राष्ट्रवादी पुरस्कृत वसंतदादा आघाडी व जनसुराज्यचा प्रत्येकी एक सदस्य आहे. भाजप व राष्ट्रवादीची सत्ता आहे.भविष्यातील राजकीय समिकरणे या निवडीवर अंवलबून असल्याने सभापती, उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागेल याबाबत उत्सुकता लागली आहे. दोन्ही पदासाठी चुरस आहे.दरम्यान इच्छुंक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. सभापतीचा राजिनामा मंजूर झाल्यानंतर निवडीचा कार्यक्रम घोषित होणार आहे. तोपर्यत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहणार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here