आंवढी | परिसरात लांडग्याचा धुमाकूळ शेळ्या मेंढ्या लांडग्यांने केल्या फस्त : शेतकऱ्यांत भितीचे वातावरण |

0
10

आवंढी,वार्ताहर : जत तालुक्याच्या उत्तर भागातील अंतराळ, आवंढी व लोहगाव गावांच्या परिसरात लांडग्याचा उपद्रव वाढला आहे. रात्री-अपरात्री शेळ्या-मेढ्या लांडग्याकडून फस्त केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या लांडग्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
जत तालुक्यातील उत्तर भागातील हा परिसर डोंगराळ अाहे.त्यामुळे वनविभागाचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.झाडीमुळे जंगली कुत्रे,कोल्हे,लांडगे,तरस या हिंस्र प्राण्यांबरोबरच ससे,सायाळ,घोरपडी याही प्राण्यांचा वावर मोठ्या संख्येने आढळून येत आहे.
या प्राण्यांचे खाद्य प्रामुख्याने कोंबड्या,शेळ्या,मेंढ्या,कोवळे गवत प्रसंगी शाडुची माती देखील खावी लागते,तसेच लांडगे,कोल्हे हे ससा,घोरपडी यांना देखील खाद्य म्हणून फस्त करतात, यावर्षी पावसाने ओढ दिल्याने डोंगरभागात खाद्याची व पाण्याची कमतरता भासू लागल्याने  लांडग्यांचा मनुष्यवस्तीत वावर वाढला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या पाळीव शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करुन त्या फस्त करण्याचा सपाटा लावला आहे.पंधरा ते सोळा लांडग्यांची टोळीच गावभागाच्या परिसरातुन रात्री व दिवसादेखील फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या पंधरा दिवसात सिताराम भिमराव कोडग यांचे बोकड,परसराम कोडग यांची मेंढी,पांडुरंग शिवलिंग कोडग यांची शेळी लांडग्यांनी फस्त केली आहे.या कळपातील लांडगे माणसांच्या अंगावर धावून येत आहेत.आर्थिक नुकसानी बरोबरच मानवी जीवालाही धोका निर्माण झाल्याने खास करुन लहान मुले व महिलांच्यात घबराट पसरली आहे,वन्यप्राण्यांनी हल्ले करून मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांना जखमी केल्यास अथवा जिवे मारल्यास वनविभागाकडुन पंचनामा होऊन आर्थिक मदतही मिळते.परंतू आर्थिक मदतीपेक्षा माणसाचा जीव महत्वाचा असल्याने या हिंस्र प्राण्यांना मानवी वस्तीत येण्यापासुन रोखण्यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहेत.वनविभागाकडून वनजमिनीत गस्तीपथक नेमावे,प्राण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी,वनविभागाच्या सीमारेषेवर काटेरी तारेचे कुंपण तयार करावे अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे वन्यप्राणीही सुरक्षित राहतील आणि मानवी वस्तीलाही धोका पोहचणार नाही असे मत या परिसरातील नागरीकांनी व्यक्त केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here