डफळापूर | प्रा.आ.केंद्रात कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांची हेळसांड | www.sankettimes.com

0
4

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची मनमानी कारभारामुळे रुग्णांचे बेहाल होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सज्जनराव चव्हाण यांनी केली आहे.
ते स्वत:एका रुग्णाबाबत केंद्रात फोन करत होते,मात्र तब्बल अर्धा तास फोन न लागल्याने त्यांनी थेट केंद्र गाठत परिस्थिती पाहिली.त्यावेळी फोन रिसिव्हर बाजूला काढून ठेवल्याचे निदर्शनास आले.त्यापलिकडे नेमके कोन कर्मचारी आहेत.हे समजले नव्हते.कुणीही काय पाहिजे विचारपूस केली नाही.परिणामी चव्हाण यांनी वैद्यकीय अभिजित चौथे यांना यांची कल्पना दिली.ते तातडीने केंद्रात आले.त्यांना कर्मचाऱ्यांचे प्रताप चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.त्यावर डॉ.चौथे यांनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.यापुढे ड्रेस कोड व नेमका कोन कर्मचारी डुटीवर आहेत.यांच्या माहितीचा फलक केंद्रात लावून यापुढे सुधारणा करून घेण्याचे आश्वासन दिले.दरम्यान याबाबत गंभीर दखल घ्यावी,कर्मचाऱ्यामुंळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करा असे यावेळी चव्हाण यांनी डॉक्टरांना सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here