तत्कालीन तालुका कृषि अधिकारी लांडगेसह तिघे निलंबित जतेत खळबंळ : सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केला होता पाठपुरावा

0
13

जत,प्रतिनिधी:  निगडी खुर्द(ता.जत) येेथील महात्मा फुले भूमी व जलसंधारण योजनेत कामे न करताच जवळपास दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन तालुका कृषि अधिकारी बी.डी.लांडगे, मंडल कृषि अधिकारी एम.एन.खुडे व कृषि सहाय्यक एस.एन.राठोड यांना हे प्रकरण अंगाशी आले आहे.या योजनेतील खर्ची टाकलेली रक्कम भरूनही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.यामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात खळबंळ उडाली आहे. या संदर्भात जत येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी गेल्या तेरा महिन्यापासून पाठपुरावा केला होता.सांगली,पुणे येथे कृषी कार्यालयासमोर उपोषणही केले होते.त्यांच्या या पाठपुराव्यामुळे कृषि आयुक्तांनी सोमवारी त्यांचे निलंबनाचे आदेश दिले. दरम्यान, यामुळे कृषि विभागातील भ्रष्टाचारी कारभार पुन्हा समोर आला आहे. दरम्यान, या तीन अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.दुष्काळी जत तालुक्यातील अनेक विभागात मोठ्या प्रमाणात भष्ट्र कारभार चालतो.त्यांना यामुळे चपखराक बसली आहे.मनरेगा,कृषी विभागाच्या अशा भष्ट्राचार प्रकरणामुळे तालुक्यातील विकास कामावर मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, आयुक्तांच्या या दणक्यामुळे संपूर्ण कृषि विभागामध्ये खळगळ माजली आहे. निगडी खुर्द येथे महात्मा फुले भूमी व जलसंधारण योजनेत झालेला भ्रष्टाचार सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी चव्हाट्यावर आणला होता. जिल्हाधिकारी कार्यालयापासून आयुक्त कार्यालयासमोर त्यांनी याबाबात आंदोलन केल्यामुळे अखेर विभागीय आयुक्तांना कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे.  महात्मा फुले भूमी व जलसंधारण योजनेसाठी जत तालुक्याला सन 2016-17 मध्ये भरघोस निधी मिळाला होता. हा निधी ग्रामपंचायतींची मागणी व शिफारशीनुसार जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन खर्च करावयाचा होता.
या योजनेतील कामे ग्रामपंचायतींच्यामार्फत करण्याचे आदेश असतानाही तत्कालीन तालुका कृषि अधिकारी लांडगे, मंडल कृषि अधिकारी खुडे व कृषि सहाय्यक राठोड यांली संगनमताने महात्मा फुले भूमी व जलसंधारण योजनेत निगडी खुर्द येथे काम न करताच बिले काढली होती. याबाबत ढोणे यांनी आवाज उठविल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांनी विटा उपविभागीय कृषि अधिकाऱ्यांची समिती नेमून चौकशीचे करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी चौकशी करत कृषि विभागीय कृषि आयुक्तांना याबाबत अहवाल दिला होता. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत दक्षता समिती नियुक्त करुन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती. तसेच या समितीचे ग्रामस्थांशी संवाद साधत अहवाल तयार केला होता.
या अहवालामध्ये दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई तसेच भ्रष्टाचारातील रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. भ्रष्टाचारातील सुमारे दहा लाख रुपयांची रक्कमही या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात आली होती. मात्र काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यामुळे लांडगे यांच्यासह दोषी अधिकारी कारवाईपासून लांबच होते. जिल्हा स्तरावरील अधिकारी कारवाई करत नसल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी थेट कृषि आयुक्तांच्या कार्यालयासमोरच 15 ऑगस्ट रोजी उपोषण केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी सोमवारी तत्कालीन कृषि अधिकारी लांडगे यांच्यासह मंडल कृषि अधिकारी खुडे व कृषि सहाय्यक राठोड यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हा कृषि विभागात खळबळ माजली आहे.

पाठपुराव्यामुळेच भ्रष्टाचाऱ्या कारवाई
जत तालुक्यातील कृषि विभागासह सर्वच विभाग भ्रष्टाचाराचे आगार बनले आहेत. महात्मा फुले भूमी व जलसंधारण योजनेतील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणल्यानंतरही काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र यासाठी गेल्या तेरा महिन्यापासून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला.जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली,पुणे येथील कृषी कार्यालयासमोर उपोषणही केले. कृषि आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. त्यामुळेच भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्यावर आयुक्तांना कारवाईचा बडगा उगारावा लागला.तालुक्यातील जनतेच्या अज्ञानपणाचा फायदा घेत असे तालुक्यातील सर्वच प्रशासनातील अधिकारी भष्ट्र कारभार करून शासकीय निधीचा गैरकारभार करत असल्याचा आहे.या प्रकरणामुळे याला जरब बसेल.माझा यापुढेही अन्य विभागातील अशा भष्ट्र प्रकरणावर मी आवाज उठवणार आहे.
विक्रम ढोणे, सामाजिक कार्यकर्ते, जत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here