जत,प्रतिनिधी: जत पंचायत समितीच्या सभापती मंगलताई प्रकाश जमदाडे यांनी कार्यकाळ पुर्ण झाल्याने पक्षाचे नेते आमदार विलासराव जगताप यांच्याकडे सभापती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नुतन सभापती निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.जत पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सभागृहात भाजप 9 व राष्ट्रवादीचे पुरस्कृत 1 यांनी आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. त्यात भाजपचे ताकतवान नेते प्रकाश जमदाडे यांच्या पत्नी मंगलताई जमदाडे यांना पहिल्या सव्वा वर्षासाठी संधी मिळाली होती.कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी आमदार जगताप यांच्याकडे राजीनामा दिला आहे. तो अद्याप मंजूर केला नाही.दरम्यान नविन सभापती पदासाठी भाजपकडून बसर्गी गणाच्या सुंनदा तावशी,संख गणातील कविता खोत यांची नावे चर्चेत आहेत. आमदार विलासराव जगताप यांचा शंब्द अंतिम असल्याने ते कोणाला संधी देतात.यावर सभापती कोण होणार हे अवलंबून आहे.
पंचायत समिती सभापती म्हणून मी पदाला न्याय दिला आहे. काही संकुचित जिल्हा परिषद सदस्यांमुळे मला म्हणावे तसे काम करता आले नाही. मात्र आमदार विलासराव जगताप यांनी दिलेल्या संधीतून जनतेचे मोठ्या प्रमाणात प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रमाणात कामे राहिली आहेत. ती सदस्य म्हणून पुर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.
सौ.मंगलताई जमदाडे,मावळत्या सभापती





