माडग्याळ, वार्ताहर: बोर्गी बु.,बालगाव (ता.जत) येथे वाळूतस्करी रोकण्यासाठी गेलेल्या दक्षता पथकाने पकडलेला वाळू तस्करीतील टँक्ट्रर वाळू तस्करांनी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करून पळवून नेहल्या प्रकरणी ट्रक्टर मालक संजय बसनिंगप्पा बिराजदार रा.बोर्गी,परगोंडा कल्लाप्पा तळेवाडी रा.बालगाव यांच्यावर उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान दक्षता पथकाने मंगळवारी वाळू तस्करी ठिकाणावर छापामारी केली
त्यांवेळी निगडी बु.व बालगाव येथील बोर नदी पात्रात बेकायदेशीर वाळू काढत असलेल्या टॅक्टर पथकाने पाठलाग करून पकडले मात्र वाळू तस्करांनी पथकातील अधिकाऱ्यांना धक्काबुकी करून टॅक्टर पळवून नेहल्याची फिर्यादीत म्हटले आहे. बोर्गी, सिध्दनाथ, संख येथे तीन टॅक्टर पकडले आहेत.त्यांचे टॅक्टर ताब्यात घेऊन प्रत्येकी दीड लाखाचा दंडाची कारवाई प्रस्तावित केली आहे. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे,तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी राहूल कोळी, तलाठी नितिन कुंभार,गणेश पवार,विशाल उदगिरे,व बोर्गी, बालगाव,संख,सिध्दनाथचे तलाठी, पोलिस पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.





