जत | आज “कलाकार स्नेहमेळावा 2018″चे आयोजन, मेघराजराजे भोसले, सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची उपस्थिती |

0
7

जत,प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व लायन्स क्लब जत यांच्या संयुक्त विद्यमानाने कलाकार स्नेहमेळावा 2018 चे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले,संचालिका तथा प्रसिध्द अभिनेत्री वर्षा उसगांवकर,दिगदर्शक महादेव जाधववर,सुनिल नाईक डॉ. रविंद्र आरळी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
आज बुधवार ता.21ऑगष्टला दुपारी 1 वाजता उमा नर्सिंग कॉलेज, विजापूर रोड जत येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. जत तालुक्यातील सर्व प्रकारच्या कलाकारांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनकर पंतगे यांनी केले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे,मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
जत तालुक्यातील कलाकारांना आपल्या कला दाखविण्यासाठी हे एक व्यासपिठ आहे.येथे कलेनुसार त्यांना चित्रपट,नाटकांत कामासाठी निवड करण्यात येणार आहे. राज्यभरातील मराठी चित्रपट,नाटकांचे दिगदर्शक,अभिनेते,अभिनेत्री या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.अगदी तबला,मुंदुग,पवा,डबरू,टाळ,ते वेगवेगळ्या आवाज काढणारे,कला येणारे, व चित्रपटात येऊ इच्छिणाऱ्यांनी या कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आवाहन पंतगे यांनी शेवटी केले.
अभिनेत्री अश्विनी जाधववर,वर्षा सोनार,अभिनेता अविनाश शिंदे, के.अजितकुमार, यासिन जिगर,रांजेद्र आरळी,सुरेखा पंतगे,राजू सांवत,नजिरभाई चट्टरकी,गिरिष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here