जत,प्रतिनिधी:पारधी तांड्यावरील पोलीस कारवाईत अटक करण्यात आलेल्या सहजणांना 31 अॉगष्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता पोलीस निरिक्षक राजू ताशीलदार यांनी व्यक्त केली.तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या होत्या.त्यातील अनेक आरोपी सापडत नव्हते.त्या पाश्वभूमीवर
पोलीसांनी शहरातील पारधी तांड्यावर सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन केले. त्यात पाच दुचाकी,6 जिलेटीन कांड्या, गँस कटर, गँस शेगडी, 3 कटावण्या,लोंखडी पाईप, वायर, लोंखडी पाने, 2 लोंखंडी प्लग पाने, 2 फ्रेम, एक्सा ब्लेड, फेशर बेल्ड, 8 कटरचे ब्लेड, नायलान दोरी, 2 रेग्यूलटर, 2 पाईप कटिंग करण्याचे गँस कटर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरफोडी सारख्या गंभीर गुन्हातील संशियत शिवाजी पल्हाद चव्हाण (वय-23), संतोष पल्हाद चव्हाण (वय-22) यांच्यासह अन्य चार रेकार्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान ताब्यात असलेल्या चार सशयिंतापैंकी बाबाजी उर्फ बाबू मच्छिंन्द्र चव्हाण हा चोरी,सरकारी कामात अडथळा अादी गुन्ह्यात 2011 पासून फरारी होता.त्याला कोंबिग ऑपरशेन मध्ये ताब्यात घेतले होते.सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.याप्रकरणी अधिक तपास हवलदार वीर करत आहेत.





