आवंढी |14 व्या वित्त आयोगाची बँक खाती लॉक करुन ग्रामपंचायतींची मुस्कटदाबी;आण्णासाहेब कोडक |

0
5

निर्बंध न उठविल्यास 4 संप्टेबरला ठिय्या अंदोलन

आवंढी वार्ताहर :जत तालुक्यातील ग्रामपंचायतीचे 14 व्या वित्त आयोगाच्या बँक खात्यावरील निर्बंध तातडीने उठवावेत अन्यथा 4 सप्टेंबरला पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा
आखिल भारतीय सरपंच परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी दिला.आपला गाव आपला विकास अंतर्गत निधी गावच्या विकासासाठी शासनाने थेट ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांवर जमा केला.त्यामुळे ग्रामविकासाची योग्य पद्धतीने कामे पुर्ण होऊन वेळेत कामांची बिले निघत असल्याने कामांचा वेगही वाढला आहे. हे खरे असले तरी जत तालूका मात्र यासाठी अपवाद ठरत आहे.जतच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींची 14 व्या वित्त आयोगाची बँक खाती लाँक करण्याचा ठराव चक्क एकमताने संमत झाला.इतर वेळी विकासमात एकमेकांची खुळीमुळी काढणाकरदस्य बँक खाती लाँक करण्यासाठी कसे काय एकत्रीत आले हा संशोधनाचाच विषय बनला आहे.कामांची मागणी,मंजूरी,एम.बी.पुर्णत्वाचा दाखला यासाठी आगोदरच पंचायत समितीचे उंबरठे झिजवुन सरपंच आणि ग्रामसेवक थकलेले असतात.अशातच आता खाती लॉक केल्याने अजून डबल हेलपाटे मारण्याचे काम लावण्याचा उद्योग जत पंचायत समितीने चालवला असल्याचे आरोप आखिल भारतीय सरपंच परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी केला.पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच व सदस्यांची बैठक झाली.यावेळी गटविकास आधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन बॅक खाती पुर्ववत करावीत अन्यथा 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.यावर गटविकास आधिकारी वाघमळे यांनी बँक खाती लॉक करण्याचा निर्णय पंचायत समितीच्या मासिक सभेचा असून मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन त्वरीत खाती सुरु करण्याचे अश्वासन दिले.तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी ग्रामसेवक, एखाद्या गावाने पैशाची अफरातफर केली म्हणून तालुक्यातील सर्वच गावांना शिक्षा देणे चुकीचे आहे.तो लोकहिताच्या कामाला खोडा घालण्याचे प्रकार आहे.यावेळी पं.स.चे विस्तार अधिकारी,महिला तालुकाध्यक्ष सौ.पाटील,तालुक्यातील सरपंच,उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

14 व्या वित्त आयोगाची बँक खात्याचे लॉक काढावे या मागणीचे निवेदन बिडिओ वाघमळे यांना देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here