बलात्काराचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालवुन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करावी- केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले
संख गावातील पिडित मुलीच्या कुटुंबियांना
ना.आठवलेंच्याहस्ते सांत्वनपर आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान
सांगली : जिल्ह्यातील जत तालुका येथील संख या गावातील अतिमागास समाजातील एका महाविद्यालयीन मुलीस तिच्या घरातून उचलून नेऊन बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याची अमानुष घटना काही महिन्यापुर्वी घडली होती.त्या पीडित सोनवणे कुटुंबीयास आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवलेसाहेब यांनी सांत्वनपर भेट देऊन मयत मुलीच्या शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बळीत मुलीच्या कुटुंबियांना 4 लाख 12 हजार रुपयांचा सांत्वनपर निधीचा धनादेश केंद्रिय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवलेंच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे 50 हजार रुपयांचा सांत्वनपर निधी पिडित मुलीच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे मा.ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले.यावेळी पिडित मुलीचे वडील आणि भाऊ यांनी सांत्वनपर मदतीचा धनादेश स्वीकारला.
यावेळी जतचे आमदार मा.विलासराव जगताप, रिपाईचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक मा.जगन्नाथ ठोकळे,प.महा.प्रदेश उपाध्यक्ष मा.संजयरावजी कांबळे,युवक प.महा.प्रदेश उपाध्यक्ष मा.नानासाहेब वाघमारे,जिल्हा प्रभारी तथा कडेगांव तालुकाध्यक्ष मा.महादेव होवाळ,नगरसेवक मा.लालासाहेब वाघमारे,तासगांव तालुकाध्यक्ष मा.प्रविण धेंडे,जिल्हा उपाध्यक्ष मा.पिंटू माने,रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष मा.विजयकुमार बारशिंगे खानापुर तालुकाध्यक्ष मा.बाबासाहेब कांबळे,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.विजय कांबळे,युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.आशिष गाडे,पलुस तालुकाध्यक्ष तथा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.राजेश तीरमारे,आटपाडी तालुकाध्यक्ष मा.राजेंद्र खरात,विद्यार्थी आघाडी प.महा.प्रदेश अध्यक्ष मा.बोधिसत्व माने,युवक जिल्हा सरचिटणिस मा.अरुणभाऊ आठवले,जत तालुकाध्यक्ष मा.नारायण कामत,जत तालुकाध्यक्ष मा.श्रीकांत होवाळ जिल्हा उपाध्यक्ष मा.सचिन जाधव,मा.संजय देवनाळकर,मा.बापु सोनावणे,पै.सुनिल साबळे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त मा.सचिन कवले तसेच शासकीय अधिकारी-रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते.
बलात्कार करून खून करण्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.अश्या अमानुष घटना रोखण्यासाठी बलात्कार करून खून करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा केली पाहिजे. तसेच बलात्काराच्या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालविले जावेत अशी मागणी मा.ना.रामदास आठवले यांनी आज जत येथे केली आहे.
संख गावातील पिडित मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यातील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. मात्र याप्रकरणी आणखी आरोपी असण्याची शक्यता असून या बलात्कार आणि खुन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची तसेच गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी मा.ना.रामदास आठवले यांनी केली आहे._





