डफळापूर | बिअरबारवर दरोडा,सशस्त्र हल्ला,काचा,साहित्याची तोडफोड |

0
7

जत,प्रतिनिधी:डफळापूर(ता.जत)येथील बसस्टँड परिसरातील मीना बिअरबारवर अज्ञात दहा-बारा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. सहा हजाराची रोकड व मोबाईल लंपास केला.शुक्रवारी रात्री आठच्यादरम्यान हल्ला करून बिअरबारच्या काचा,साहित्याची तोडफोड केली.
याबाबत जत पोलिसात गुन्हा झाला आहे. मालक साहेबलाल आत्तार यांनी फिर्याद दिली आहे.दरोडाप्रकरणी संशियत प्रंशात परीट, दादा माने या दोघांना पोलिंसानी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, डफळापूर येथील संशियत गणेश पाटोळे याची व बारचे मालक साहेबलाल यांचा भाचा आयाज तांबोळी यांची शुक्रवारी सकाळी वादावादी झाली होती.त्यातून गणेश पाटोळे, प्रशांत बाळासो परीट (दोघे रा.डफळापूर), रावसाहेब हिप्परकर (रा.कुडणूर), दादासाहेब माने (रा.डोर्ली), आंनदा नाईक (रा.ढालगाव), व अनओळखी 5 ते 7 जणांनी शुक्रवारी रात्री हल्ला केला. तलावारीसह बारमध्ये प्रवेश केला.दारू का दिली नाहीस. असे म्हणून तलवार काऊंटरवर मारली. काऊंटरमधील रोख सहा हजार व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.दारूच्या तीस बाटल्या फोडून नुकसान केले. अत्तार यांच्या काकाचे दुसऱ्या मजल्यावर दुकान आहे.  त्याच्या काचाही फोडल्या. तलवारी, गुप्ती,सत्तूर दाखवून जिंवत सोडणार नाही, अशी धमकी दिली. इतर दुकानदारांना धमकावून दुकाने बंद करण्यास सांगितले. व गाडीवरून पळून गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान घटनेनंतर डफळापूर येथे रात्री उशिरापर्यत तणाव होता.पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार यांनी घटनास्थंळी भेट दिली.दरोडा घालून दहशत माजवून जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here