संख,वार्ताहर: येथे गुरूबसव नागरी सह.पतसंस्था संखचे उद्घाटन बालगाव आश्रमाचे अंमृतानंद महास्वामीजी यांच्या हस्ते संपन्न झाले. संख परिसरीतील होतकरू व्यापारी,छोट्या उद्योजकांना कर्ज पुरवठा करून सक्षमता आणण्यासाठी ही संस्था काम करेल,ठेवी,बचत,पिग्मी आदीवर उत्कृष्ठ व्याजदर, पारदर्शी कारभार संस्थेतून चालणार आहे.संख परिसरीतील गावातील व्यापारी, गरजूंना कर्ज पुरवठा करून आर्थिक मदतीचा हात देण्यात येणार आहे.भाजपचे नेते माजी सभापती आर.के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कामकाम चालणार आहे.यावेळी गजानन बँक कलमडीचे चेअरमन मल्लाप्पा तुंगळ,श्रींकात पाटील,ज्योती पाटील, आर.के.पाटील महाविद्यालयाचे किरण पाटील सर ,सुरेखा पाटील, आर.बी.पाटील, अहमद शेख,निंगोडा बसर्ग्गी, व मान्यवर उपस्थित होते.
संख येथे श्री.गुरूबसव नागरी सह.पतसंस्थचे उद्घाटन करताना अमृत्तानंद महास्वामी,मल्लाप्पा तुंगळ,आर.के.पाटील व मान्यवर





