जत,वार्ताहर:महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,माजी मुख्यंमञी पृथ्वीराज चव्हाण हे जत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विक्रमसिंह सावंत व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले की,
प्रदेश काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यभर जनसंघर्ष यात्रेची दि.1 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा कोल्हापूर येथून सुरूवात होणार आहे.संघर्ष यात्रा 2 ऑगस्टपासून सांगली जिल्ह्यात येणार आहे.यात्रेची सुरूवात सकाळी शास्त्रीचौक मिरज येथून होईल, कवठेमहांकाळ मार्गे डफळापूर पुढे जत येथे यात्रेचे स्वागत करण्यात येईल. त्यानिमित्त प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा.व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे,आजी व माजी आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार मोहनशेठ कदम व युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ.विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम,महाराष्ट्रचे तालुका व जिल्हा पातळीवरील पक्षाचे प्रमुख यांची उपस्थित राहणार आहाे. त्या निमित्त जत तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक संपन्न झाली.जनसंघर्ष यांत्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे बैठकीत आव्हान केले. उपाध्यक्ष कुंडलिक दुधाळ,महादेव अंकलगी,माजी सभापती आकाराम मासाळ,जि.प.सदस्य महादेव पाटील,कलावती गौरगोंड,जत नगरपरिषदचे नगराध्यक्षा सौ.शुभांगी बन्नेनवर व पंचायत समितीचे सर्व सदस्य,बाजार समितीचे सर्व संचालक,आजी माजी नगरसेवक अनेक गावचे सरपंच व चेअरमन हे उपस्थित होते.




