जत,प्रतिनिधी: जतचे तहसीलदार म्हणून सचिन पाटील यांची नेमणूक झाली आहे. यापुर्वीचे तहसीलदार अभिजित पाटील यांची माळशिरस येथे बदली झाली.दिर्घकाळ जत येथे असणारे तहसीलदार पाटील यांनी जतच्या महसूली विभागात आमुग्राल बदल केला आहे. त्यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार,पानी,व नाम फांऊडेशनच्या माध्यमातून मोठी जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्यामुळे जत तालुका यावर्षी टँकरमुक्त झाला आहेत. जलसंधारणातून दुष्काळ हटविण्यासाठीचे त्यांचे काम तालुक्यात कायमस्वरूपी उल्लेखनीय राहणार आहे.त्याशिवाय प्रशासकीय कामातही मोठा बद्दल केला आहे. पानी फांऊडेशन कामात स्व:ता तहसीलदार अभिजित पाटील कुंटूबियांसह सामील झाले होते.नव्याने आलेले तहसीलदार सचिन पाटील या अगोदर वासिम जिल्ह्यातील कांरजालाडू या तालुक्यात तहसीलदार म्हणून नेमणूकीस होते.त्यांची बदली जतला झाली आहे.





