एंकूडी | ग्रामसभेत मनरेगा भष्ट्राचार चौकशीची मागणी |

0
2

जत,प्रतिनिधी : जत तालुक्‍यातील एकुंडी येथे अॉगष्ट महिन्यातील ग्रामसभा अनेक सामाजिक व लोकोपयोगी मुद्यांवर शांततेत पार पडली. प्रांरभी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रामसेवकांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यानंतर लेक वाचवा, स्वच्छ भारत, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेची माहिती देण्यात आली.
ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यासाठी काही ग्रामस्थांनी रस्त्यांचा विषय मांडला या विषयावर एकमत होऊ शकले नाही.माजी सरपंच चिदानंद पाटील यांनी मनरेगा योजनेत 2016-17 या सालात अनेक कामे मंजूरी एका नावाने आणि काम एकाच्या शेतात झाल्याचे सभेच्या निदर्शनास आणून दिले व झालेल्या कामांची चौकशी करणे बाबत विषय मांडला त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
सरपंच बसवराज पाटील म्हणाले की, गावात यापुढे भ्रष्टाचाराला कुठल्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. त्यातच मानरेगा योजनेच्या रकमेत जर स्थानिक भ्रष्टाचार केला असेल तर त्याला माफ केले जाणार नाही. त्यामुळे रक्‍कम काढताना ज्या ठेकेदाराच्या सहीने रक्‍कम काढली गेली, त्याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन सरपंचानी दिल्यानंतर यावर पडदा पडला.उपसरपंच सरोजिनी कोरे, ग्रामविकास अधिकारी जी.एल्.साळुंखे, ग्रापंचायत सदस्य तुकाराम कांबळे, सिद्राम कोरे, सुरेश शेगणे, सदाशिव शेगावे, रविंद्र शेगावे, हणमंत कांबळे, भगवान कांबळे, रमेश कोरे, दुर्योधन गुड्डोडगी आदीं ग्रामस्थ उपस्थित होते.

एंकोडी ग्रामसभेत गावातील रस्ते, प्रधानमंत्री घरकूल, रस्ता समिती, तंटामुक्ती समिती अशा अनेक विषयावर ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here