सांगली | संगीता खोत सांगलीच्या नव्या महापौर, तर धीरज सूर्यवंशी उपमहापौर |

0
6

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. भाजपच्या संगीता खोत यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची नेमणूक झाली आहे. सांगली महापालिकेचं महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार वर्षा अमर निंबाळकर यांना 35 मतं पडली. तर भाजपकडून संगीता खोत यांना 42 मतं मिळाली. तसंच उपमहापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी 42 मते पडली तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून स्वाती पारधी यांना 35 मतं पडली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here