जत | महसूल विभागाकडून केरळ मधील पुरग्रस्तांना 322 बॉक्स बिस्किट रवाना |

0
3

जत,प्रतिनिधी : केरळमधील पूरस्थिती गंभीर असून तेथील नागरिकांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिक, दानशूर व्यक्ती, व्यापारी यांनी आपत्तीग्रस्तांना सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले होते. त्यानुसार जत तहसिलदार अभिजित पाटील यांच्या पुढाकारातून जत तालुक्यातून 322 बॉक्स बिस्किट पुरग्रस्तांना पाठविण्यात आले आहे.मदतीत डफळापूर मंडल 44,प्रकाश जमदाडे 15,पुरवठा विभाग 44, जत तहसील कार्यालय 28,जत मंडल 20,उमदी मंडल 10,शेगाव 10,माडग्याळ 10,कुंभारी 10,संख 10,स्टॅपव्हेडर 10,उमेश सांवत 25, पोलिस स्टेशन 10,मोहन भोसले सेतू 10 अन्य 19 बॉक्स बिस्किट वेगवेगळ्या विभागाकडून मदत म्हणून मिळाले आहेत.

जत महसूल विभागाकडून केरळ मधील पुरग्रस्तांना 322 बॉक्स बिस्किटाचे संकलन करण्यात आले आहे.यावेळी तहसीलदार अभिजित पाटील,गायब तहसीलदार मस्मे,जत तलाठी उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here