आंवढी,वार्ताहर: आंवढी ता.जत येथील संपुर्ण गावात दारू बंदीसह अवैद्य धंदे बंद करण्याचा महत्वपुर्ण ठराव मंजूर करण्यात आला.यासाठी आंवढीतील सावित्रीच्या लेंकीनी पुढाकार घेत गाव विकासात महत्वाची भुमिका बजावणार असल्याचे सिध्द केले.
ग्रामपंचायतीची महिलासाठी विशेष सभा संपन्न झाली.सभेच्या अध्यस्थानी संरपच आण्णासाहेब कोडग होते.
प्रांरभी विकासाच्या नविन योजना,गावासाठी जनतेचे योगदान व प्रशासनाची भुमिका स्पष्ट करण्यात आली. गाव विकासाला महत्व देण्यात यावे.दर्जेदार विकास कामे व्हावीत.त्याशिवाय गावचा नावलौकिक मिळविण्यासाठी दारूसह अवैद्य पुर्णत: बंद करण्याची मागणी उपस्थित महिलांनी लावून धरली.त्याबाबत सर्वानुमत्ते ठराव घेण्यात आला. तो पुढे पोलिसाकडे पाठविण्यात येणार आहे.यावेळी महिलाची एक कमिटी स्थापण्यात आली आहे.या कमीटीचे पदाधिकारी असे अध्यक्ष सौ.संगिता दिलिप कोडग,उपाध्यक्ष रत्नमाला शामराव कोडग,सचिव प्रतिभा तानाजी कोडग,सहसचिव अर्चना सुधाकर कोडग,कांचन सुभाष कोडक,पोलिसपाटील गिता आण्णासाहेब कोडग यांचा समितीत समावेश आहे.या सभेत दारू बंदीसह अवैद्य धंदे बंद करण्याचा ठराव मांडण्यात आला.त्याला सर्वानुमत्ते मंजूरी देण्यात आली आहे.24 ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत याबाबत संबधितांना अवैद्य धंदे बंद करण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत.त्यापुढेही जर हे अवैद्य धंदे सुरू राहिले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या सभेत ठरले.
यावेळी बोलताना संरपच आण्णासाहेब कोडग म्हणाले,आम्ही निवडणूकी पुर्व विकास कामातून आदर्श गाव करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. तशीच लोकानुभिमूक पारदर्शी कामे करण्यात येत आहेत. पाणी फौंडेशन सारख्या महत्वाच्या कामात गावातील महिलाचे मोठे योगदान राहिले अाहे. त्यामुळे आंवढी सारख्या गावाची मुख्यंमञी देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत गावाला भेट दिली.या सर्व प्रक्रियेत ग्रामस्थाचे सहकार्य महत्वपुर्ण राहिले अाहे. विकासासाठी महिलांनी मांडलेला दारूसह अवैद्य धंदे बंदचा ठराव आम्ही सर्वानुमत्ते मंजूर केला आहे. पुढील काही दिवसात गावातील संपुर्ण अवैद्य धंदे बंद झालेले दिसतील.या सभेला सुमारे दीडशे महिला उपस्थित होत्या.
Home Uncategorized आंवढी | अवैद्य धंदे बंद करण्यासाठी सावित्रींच्या लेकींचा पुढाकार,विशेष सभेत ठराव |





