जत | जिल्हा परिषदेचे विद्यमान पदाधिकारी बदलाची मागणी |

0
1

जत,प्रतिनिधी: सांगली जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा एक वर्षाचा कलावधी संपलेला आहे.त्यामुळे पुढील निवडीत अध्यक्षपदाचा मान दुष्काळी जत तालुक्याला द्यावा अशी मागणी जत तालुक्यातील भाजपच्या 5 जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व खा.संजय पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की,गत वर्षी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापने वेळी ठरल्याप्रमाणे विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कलावधी वर्षापेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे त्यांचे राजीनामे घेऊन नवे पदाधिकारी निवडावेत.त्यात नविन निवडीत जतला अध्यक्ष पदाचा मान द्यावा अशीही मागणी केली आहे. पत्रावर जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,सौ.सुनिता सुनिल पवार,स्नेहलता प्रभाकर जाधव,रेखा महादेव बागेळी,मंगल आप्पासो नामद यांच्या सह्या आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here