जत,प्रतिनिधी: बनाळी (ता.जत) येथील एकास जमिनीच्या वादातून दगडाने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद जत पोलिसात दाखल झाली आहे.
अधिक माहिती अशी,बनाळी येथील रहिवाशी असणारे प्रभाकर आण्णाप्पा कोरे हे आपल्या शेगाव येथील शेतात झाडे लावण्यासाठी गेले होते.तेथे त्यांना पञ्याचे शेड उभारल्याचे दिसले.त्यांनी शेजारी जगन्नाथ बाबू लिंगाडे यांला याबाबत जाब विचारला असता त्यांने दगडांने मारहाण करून जखमी केल्याचे जगन्नाथ लिंगाडे यांने दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे.
किरकोळ कारणावरून
जत,प्रतिनिधी: गुळवंची (ता.जत) येथील एकास तिरका बघतोस म्हणून कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद जत पोलिसात दाखल झाली आहे.याबाबतची फिर्याद जखमी विनोद कृष्णा खडतरे(वय-28)यांने दिली.फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील आंनदा सरगर यांच्या दुधडेअरी जवळ उभा राहिलो असताना संजय शंकर पांढरे यांने माझ्याकडे तिरका का बघतोस म्हणून शिवीगाळ करत कोयत्याने डोक्यात मारहाण करून जखमी केले. दरम्यान घाव वर्मी लागल्याने विनोद गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलिस निरिक्षक आप्पासाहेब कत्ते करत आहेत.