जत, प्रतिनिधी:जत येथील श्रीविजय ज्वेलर्स या सराफ दुकानात झालेल्या 25 लाखाच्या चोरीचा अद्याप छडा लागलेला नाही. अप्पर पोलिस अधिक्षक शंशिकात बोराटे यांनी घटनास्थंळी भेट दिली. जत पोलीसांनी मोडस ऑपरेंडीवरून काही रेकॉर्डवरील चोरट्यांकडे चाैकशी सुरू केली आहे.
रविवारी मध्यरात्री चोरांच्या टोळीने शहरातील मध्यवर्ती कापड पेठेतील श्रीविजय ज्वेलर्स हे सराफ दुकान फोडून सुमारे 25 लाखांच्या सोने-चांदीचे दागिण्यावर डल्ला मारला. या धाडसी चोरीचा तपास हे एक अाव्हान बनले आहे.
मंगळवारी अप्पर पोलीस अधिक्षक शंशिकात बोराटे क घटनास्थंळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना तपासाच्या सुचना दिल्या आहेत. जत पोलिसाची काही पथके वेगवेगळ्या भागात चोरट्याचा शोध घेत आहेत. जतचे पोलिस निरिक्षक राजू तासिलदार यांनी मंगळवारी दिवसभर रेकॉर्ड वरील गुन्हेगारांकडे कसून चाैकशी केली. काही ठिकाणी छापे टाकले. दरम्यान श्वान पथकाने माग काढलेल्या दिशेनेही काही माहिती मिळतेय का हेही पोलिस पाहत आहेत. चोरी झालेल्या सराफाकडे मुद्देमालाची सर्व बिले नाहीत. त्याशिवाय ते दागिने कोठून आणले यांचीही माहिती मिळत नसल्याने तपासाला मर्यादा पडत आहेत. त्यामुळे तपास वेगळ्या पध्दतीने करावा लागत असल्याचे पो.नि. तासिलदार यांनी सांगितले.