जत,प्रतिनिधी;जत तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नामूळे अन्याय होत आहे.जतच्या विकासाविषयी तळमळ असणाऱ्या माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
उपाययोजना करणेबाबतचे भावनिक पत्र लिहून आवाहन केले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे कि,जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठा असून कायम दुष्काळी आहे.एकही बारमाही नदी नसल्याने शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कोणतेही ठोस सोय नाही. केवळ पावसाच्या पाण्यावर येथील शेती अवलंबून आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे.याकरिता शासनाने त्वरीत शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी.तसेच 25 ते 30 एकर शेती असूनही याठिकाणचा शेतकरी ऊसतोडीला जात आहे. तालुक्यातील विविध विभागातील सुमारे प्रमुख अधिकारी व शेकडो कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.त्यामुळे विकास कामे,जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मर्यादा पडत आहेत.पंचायत समितीतील सहाय्यक गटविकास अधिकारी,छोटे पाटबंधारे विभाग उपअभियंता,गटशिक्षणाधिकारी,महिला बालकल्याण अधिकारी,व प्रांताधिकारी देखील प्रभारी आहे.यांचा परिणाम जनतेची गैरसोय व विकास खूंटला आहे. शिक्षकाचे सामानीकरणाच्या नावाखाली तालुक्यावर मोठा अन्याय झाला आहे. शिक्षण विभागातील 23 टक्के पदे ,पशुसंवर्धन विभागातील 35 टक्के,आरोग्य 32 टक्के ,बांधकाम 15 टक्के ,ग्रामीण रुग्णालय जत 40 टक्केे अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयात एक्स रे मशिन नाही,याठिकाणी 100 खाटाचा प्रस्ताव मंजूर झाला, परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही,प्रशासकीय इमारताची 1 वर्षापासून प्रस्ताव शासनाकडे आहे.जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग असे मिळून 1200 कि.मीचे रस्ते जत पंचायत समिती बांधकाम विभाग कडे आहेत.या रस्त्याकरिता शासनाकडून अत्यल्प तुटपुंजा निधी दिला जातो.याकरिता भरीव निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. म्हैसाळ योजनाचा 1995 ला तालुक्याचा समावेश झाला आहे. आजपर्यंत म्हणावा तितका निधी उपलब्ध करून दिला नाही.गेल्या 4 वर्षात खासदार संजय पाटील व आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नांनाने निधी मिळाल्याने कामे प्रगतीत आहेत.याचबरोबर पूर्व भागातील 42 गावे या योजनेपासून वंचित आहेत.त्यासाठी स्वंतत्र योजना आखने गरजे आहे.माडग्याळ,बसर्गी ,उमराणी,सिंदूर ,गुगवाड यासह वंचित गावाचा समावेश म्हैशाळ योजनेत तर बेवनूर ,नवाळवाडी या गावांचा समावेश टेंभू योजनेत करावा. बोर नदीत 10 चेकडॅम प्रस्ताव शासनस्तरावर सादर केले आहे त त्यास मंजुरी देण्यात यावी.महवितरण कडे 2013 पासून विहीर व बोअरचे कनेक्शन अद्याप देण्यात आली नाहीत.संख उपविभागतील सहाय्यक अभियंता हे पद रिक्त आहे.ट्रान्सफार्मर जळून महिना झालेतरी मिळत नाही.वादळी वाराने पोल पडलेले आजूनही बसवलेले
नाहीत.शेतकऱ्यांना बेहिशेबी व मनमानी बिले दिली जातात.मीटर रिंडिग प्रमाणे बिले मिळत नाहीत.तरी याविषयी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
जत तालुक्याचे त्रिविभाजन करणे गरजेचे आहे,कारण तालुका विस्ताराने मोठा आहे.विभाजन नसल्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे. अनेक वर्षाची विभाजनाची मागणी पुर्ण करावी.एमआयडीसी डी-झोन किंवा अवर्षण प्रवर्ग क्षेत्र म्हणून पंचतारांकित एमआयडीसी करावी.जणेकरुन या भागातील तरुणाना रोजगार मिळेल.जत एमआयडीसी मध्ये एक ही मोठा उद्योग व्यवसाय नाही.जत तालुक्यात 5 हाजार हेक्टर गायरान आहे. याठिकाणी सोईसुविधा उपलब्ध करुन मोठे मोठे प्रकल्प उभा करावेत. निसर्गाचा हवामानाचा अंदाज जाणून घेणेकरिता तालुक्यात पंचायत समिती मतदारसंघात पर्जन्यमापक,हवामान यंत्रे बसवावे,शेतीमालाला योग्य मिळण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत.महसूल विभागातील गेल्या वर्षाभरापासून सातबारा व आठ अ संगणीकरण चालू आहे ती प्रक्रिया अद्याप पुर्ण न झाल्यानी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे वेळेवर उतारे व दाखले मिळत नाहीत. या कारणाने आॅनलाईन प्रक्रिया परीपूर्ण होईपर्यंत पूर्वी प्रमाणे हस्तलिखित उतारे व नोंदी करण्याबाबतचे आदेश द्यावेत.तालुक्यातील अवैध धंद्याना जत,व उमदी पोलिसाचे पाठबंळ असल्याने सामान्य नागरिकाना त्रास होत आहे. यामुळे गुन्हेगारीस वाव मिळत आहे.बेकायदेशीर दारू,सिंदी, वाळू तस्कर,ढाबे,हाॅटेल,खाजगी वडाप,मटकाबुकी यांचेकडून सर्रास राजेरोसपणे हप्ते गोळा केले जातात. यांचा बंदोबस्त करण्यात यावा. दळणवळण व वाहतूकीच्या दृष्टीकोनातून विकासाला चालना मिळणेकरिता मिरज-कवठेमंहकाळ-जत-विजापूर व पंढरपूर- मंगळवेढा-उमदी -विजापूर या दोन्ही रेल्वे मार्गाचा सर्व्हे पूर्णत्वास असून यांस मंजुरी लवकरात लवकर मिळावी.असे तालुक्यातील विविध तालुक्यातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडावावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकाश जमदाडे यांनी भावनिक पत्र लिहून जतसाठी विशेष निधी देऊन हा अनशेष भरून काढावा असे आवाहन केले आहे.