जत | धनगर आरक्षण मागणीसाठी जत,डफळापूर कडकडीत बंद |

0
5

जत,प्रतिनिधी : डफळापूर, जत येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्याला पाठींबा म्हणून तालुक्यातील संख,जत,डफळापूर,अंकले आदी गावात बंद पाळण्यात आला. कार्यकर्त्यांनी या बंदला पाठींबा दिला आहे. तसेच व्यापारी वर्गानेही पाठिंबा दिला आहे. घनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जत शहरातून रॅली काढत जतचे तहसिलदार अभिजित पाटील यांना मागण्याचे निवेदन दिले.
आरक्षणच्या लढ्याला बळ मिळणेसाठी, व धनगड या शब्दाची धनगर अशी दुरुस्ती व्हावी यासाठी जत,डफळापूर, संख,अंकले येथे बंद ठेवला होता. शासनाने इतर राज्याप्रमाणे शब्दाची दुरुस्ती करावी. या आंदोलनाने शासन जागे झाले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.शब्दाच्या दुरुस्तीसाठी लढा;धनगर आणि धनगड अशी शब्दाची फिरवाफिरवी झाल्याने आजपर्यंत हा समाज विविध सुविधापासून वंचित राहिला आहे. राज्यामध्ये एकही धनगड नाही. काही राज्यात शब्दाची दुरुस्ती केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राने दुरुस्ती करावी यासाठी समाजाचा लढा सुरु आहे.

जत येथे धनगर आरक्षण मागणीचे निवेदन तहसीलदार अभिजित पाटील यांना देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here