कवठेमहांकाळ:शोतोकॉन कराटे फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने,बालेवाडी स्टेडियम,पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी 1सुवर्णपदक,1 रौप्य पदक व 2 कास्य पदके मिळवून स्कूलच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले.
एकविसाव्या शतकात स्वसंरक्षणासाठी आवश्यक असणारा खेळ म्हणजे कराटे,त्यासाठी मोहन माळी इंटनॅशनल स्कूलमध्ये वेगळी तयारी करून घेतली जाते.संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून या स्पर्धेसाठी खेळाडू आले होते.आपली खिलाडूवृत्ती आणि क्रीडा कौशल्य दाखवत मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठा दबदबा निर्माण केला.या स्पर्धेत वैभव विजय पवार यांने सुवर्णपदक,सुरज बंडू पवार यांने रौप्यपदक तर आयुष सुधाकर बंडगर व अनुज खंडू कोकरे या विद्यार्थ्यांनी कास्यपदक पटकावत स्कूलचे नाव उंचावले. तसेच भारत पवार, विराज पाटील, अजय व्हरगर या खेळाडूंनी सहभाग घेऊन पदार्पणातच आपल्या खिलाडू वृत्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.या सर्व यशस्वी खेळाडूंना मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मोहन माळी,प्राचार्या सौ.कविता मेहरा,क्रीडा शिक्षक श्री.बिरादार सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व पदक विजेत्या चमकणाऱ्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक अप्पासाहेब र. तांबे व किरण कचरे यांनी केले. सर्व पदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे येथील कराटे स्पर्धेत मोहन माळी इंटनॅशनल स्कूल पदक विजेते विद्यार्थी





