जत | वहिवाटची रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी उमदीतील शेतकरी स्वांतत्रदिंनी आमरण उपोषण |

0
4

जत,प्रतिनिधी : उमदी ता.जत येथील जमिन सर्व्हे नंबर 36 व 37 मधील दमदाटीने बळकावलेला वहिवाटची गाडी रस्ता खुला करण्याचे आदेश होऊन रस्ता मोकळा न केल्याने त्या रस्त्याने वहिवाट असणारे शेतकरी 15 ऑगष्ट स्वंतत्रदिना दिवशी उमदी मंडल अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या सर्व्हे नंबर 36,37 नंबरमधील हा रस्ता बंद झाल्याने त्या वाटे जाणाऱ्या 100 लोकांना अडचण झाली आहे.पर्यायी रस्ता नसल्याने तेथील शाळकरी मुलांची शाळा व लोंकाच्या दळणवळण जवळपास बंद पडल्याने संतप्त प्रतिक्रिया उटमत आहे.हा रस्ता खुला करावा म्हणून तेथील शेतकऱ्यांनी 4 जुलै 2018 ला अप्पर तहसीलदार संख यांना अर्ज देऊनही राजकीय दबावापोटी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.उमदी पोलिसातही याबाबत तक्रारीही दिली आहे. त्यांनीही याकडे गांभिर्याने बघितले नाही.त्यामुळे आम्हाला जाण्या-येण्यासाठी मरणयातना सहन कराव्या लागत आहे. वहिवाटचा रस्ता बंद केल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा आमच्या शाळकरी मुलांची शाळा चुकत आहे.त्यामुळे हा रस्ता खुला करून द्यावा अन्यथा 15 ऑगष्टला आम्ही उमदी महसूल मंडळ कार्यालायसमोर आमरण उपोषण करणार असल्याचे येथील शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अवदुत गडदे,आमसिध्द गडदे,महादेव गडदे,सिध्दराम गडदे,मारूती गडदे,सिध्दाप्पा हळदवडरू,बिळेणी गडदे,सोमनिंग गडदे,कल्लाप्पा गडदे,प्रंशात गडदे,मदनगौडा गडदे,महादेव हळदवडरू,राजू हळदवडरू आदी शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here