क्रांती दिनी संस्थेला ‘महाराष्ट्र शासनाची 1 ते 8 वी पर्यतच्या वर्गांना परवानगी
डफळापूर, वार्ताहर : येथील विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलला 9 ऑगष्ट क्रांती दिनी शासनाची परवानगी मिळाली असून डफळापूरातील हे इंग्लिश मेडियम स्कूल शैक्षणिक क्रांती करणार असे उद्गार संस्थेचे सचिव रविंद्र सुतार यांनी काढले.
ते म्हणाले,डफळापूर परिसरातील मुले शिकावित,त्यासाठी दर्जेदार शिक्षणाचे ज्ञान मंदिर जतचे आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली येथील युवक नेते परशूराम चव्हाण सर यांनी उभे केले आहे. त्याला जेमतेम तीन वर्षे होत आली आहेत. अगदी अल्पवेळेत संस्थेने गरूड भरारी घेतली आहे.स्कूलची गावालगत प्रशस्त जागेत भव्यदिव्य इमारात उभी केली आहे. नेमके हेच न खपल्याने स्कूलची बदनामी चालवली होती.अगदी शैक्षणिक परवाना नसल्याचे भांडवल करत अघोरी प्रचार केला होता.मात्र प्रत्यक्षात स्कूल चालू करताना बऱ्यांचशा परवानग्या मिळाल्या होत्या.त्यांतील अंतिम परवाना ही राज्यशासनाने नुकताच संस्थेस दिला आहे. त्यांची प्रतही संस्थेला प्राप्त झाली आहे.त्यामुळे स्कूलवरचे सर्व मळंभ दूर झाले आहे.’महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यीत शाळा(स्थापना व विनियमन)अधिनियमन(सन-2013-चा 01)अतर्गंत शामराव काका पाटील एज्युकेशन सोसायटी डफळापर संचलित विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलला प्राथमिक ते उच्चप्राथमिक इ.1 ते 8 वी पर्यत इग्रंजी माध्यम राज्यमंडळ सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून परवाना दिला आहे.यापुढे शाळेचा दर्जाबरोबर सर्वोत्तम गुणवत्ता व दर्जेदार विद्यार्थी घडविण्याचे काम या स्कूल मधून केले जाणार आहे.भविष्यात माध्यमिक,उच्च माध्यमिक,ज्यू कॉलेज,सैनिकी पटर्न स्कूल,मराठी माध्यमाचे विभाग सुरू करण्याचा मानस सुतार यांनी व्यक्त केला.
विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलचे नव्याने उभारत असलेले भव्य शैक्षणिक संकुल





